कोरोना विरुध्दच्या लढ्यात कार्य केलेल्यांचा गौरव आणी सत्कार…!

   कुंडलवाडी ( प्रतिनिधी ) शहरातील नामवंत के.रामलु इंग्लिश स्कुल तर्फे आज जगभरात फैलाव झालेल्या करोना या महाभयंकर बिमारी चा शहरात शिरकाव न होऊ देण्यासाठी शहरातील नगर प्रशासन, वैद्यकिय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, यांच्यासह अन्य ज्यांनी या कार्यात स्वताःची तमा न करता. शहर स्वच्छतेसाठी न.प.कर्मचारी लाॅक डाऊनच्या काळात शिस्त पोलीस कर्मचारी व वैद्यकिय सल्ला उपचार प्रा.आ.केंद्र अशा प्रकारे त्रिसुत्री कार्यक्रम शहरात यशस्वी रित्या गेली दोन अडीच महिण्या पासून राबविला जात आहे. अशा कर्मचार्‍यांची कुणीतरी दखल घ्यावी व समाजाला पण यांच्या कार्याची ओळख करुण द्यावी.यासाठी शहरातील शालेय शिक्षणासोबत इतर राष्र्टिय उपक्रमाची नोंद घेवुनि देशाप्रति आपल्या, शहराप्रति असलेले प्रेम व्यक्त करण्यात नेहमी अग्रेसर असलेले के. रामलु इंग्लिश स्कुल, विवीध सांस्कृतीक कार्यक्रमातुनही सामाजाला बोध देण्याचे कार्य या शाळेने आजवर करुण दाखविले आहे.                असाच आजचा कार्यक्रम कार्यक्रम हा शहरातील नगर परिषदेच्या प्रांगणात पार पडला.”करोना” च्या संकटकाळी शहराची सुरक्षा व करोनाचा शिरकाव न होऊ देण्यासाठी स्वच्छता आणी सोशल डिस्टन्सचा वापर करावयास लावणारी यंत्रना म्हणजे न.प.कुं. प्रा.आ.केंद्र. पोलीस कर्मचारी यांचे मौलाचे सहकार्य लाभले. त्यांच्याच साठीचा घेतलेला एक विशेष कार्यक्रम हा कार्यक्रम गौरव त्यांचा ज्यांनी करोना या बिमारीस शहरात प्रवेश न करु देण्यासाठी घेतलेले कष्ट खरचं प्रशंसनीय आहेत. आज या गौरव सोहळ्यास शहरातील नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.डाॅ.अरुणाताई विठ्ठलराव कुडमूलवार, व नगर परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. विठ्ठलराव कुडमूलवार, जेष्ठ नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्या सह नगर सेवक व पालिकेचे मुख्याधिकारी,पेन्टे, यांच्यासह सर्व कर्मचारी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. बालाजी सातमवाड यांच्या सह नर्सेस,वैद्यकिय कर्मचारी पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सुरेशजी मांटे, विशाल सुर्यवंशी,पो.उ.नि. हे पण आवार्जून उपस्थित होते.या प्रसंगी डाॅ.कुडमूलवार यांनी मार्गदर्शन केले.       आजच्या गौरव कार्यक्रमाचा विशेष महत्वाचा क्षण म्हणजे. आज उपस्थित सर्वानी सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करित कार्यक्रम साजरा केला. उपस्थित सर्व गौरव मुर्तीचे शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करित  त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. के.रामलु इंग्लिश स्कुलच्या संस्थापक सायरेड्डी ठक्कुरवार यांच्या प्रेरणेतुन पुढाकारातुन हा कार्यक्रम साजरा केल्या गेला. यावेळी संस्थेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व महिला कर्मचारी पण उपस्थित होते.कार्यक्रम सकाळी नियोजीत साडे दहा वाजता संपन्न झाला. यात गौरव मुर्तीसह अनेक शहरातील नागरीक पत्रकार पण उपस्थित होते. शेवटी संदेश आजूनही आपण सावधानता बाळगायला हवी आहे. व शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *