Newsपरभणी

कोरोना योध्यांना आर्सेनिक अल्बम च्या गोळ्यांचे वाटप…!

सोनपेठ : राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेतृत्व राजेश विटेकर यांच्या वतीने सोनपेठ तालुक्यातील कोरोना योध्द्यांना आरर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप करण्यात आले.
कोवीड १९ या रोगांचा संसर्ग थांबवण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी च्या आर्सेनिक अलब्म ३० या गोळ्या घेण्याची शिफारस केली आहे .त्यानुसार सोनपेठ तालुक्यात कोरोना चा प्रसार थांबवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कोरोना योध्द्यांना या विषाणू चे संक्रमण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप केले .तालुक्यातील पोलीस,शिक्षक,आशा,अंगणवाडी ताई या सह आरोग्य विभाग,पंचायत समिती,महसुल या सह कोरोना ची अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना या औषधाचे वाटप करण्यात आले. एक हजार हुन अधिक कुटुंबियांना या औषधीचे वाटप करण्यात आले. राजेश विटेकर यांच्या हस्ते विभाग प्रमुखांना या औषधांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर बिंदू यांनी केले.
या वेळी नगर परिषदेचे गट नेते चंद्रकांत राठोड,गट विकास अधिकारी सचिन खुडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी,गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण,नगर सेवक डॉ श्रीनिवास गुळभिले,डॉ विष्णू राठोड,जगदिश बुरांडे,मदन विटेकर,अमर वडकर,दिलीप सातभाई, मधुकर निरपणे,विनोद चिमणगुंडे,राजाभाऊ दहिवाळ,ताराचंद बेथमुथा,शिवाजी भोसले बाजार समिती सचिव अशोक भोसले ,तुकाराम भालेकर,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *