दैनिक जगमित्र चे जिल्हा प्रतिनिधी शेख ताहेर कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित..!
बीड : कोरोना पार्श्वभूमीवर सगळा देश लॉकडाऊन असताना. ज्या कोरोना योद्धांनी आपले जीव धोक्यात घालून मदत कार्य केले आहे आपले कर्तव्य पार पाडले आणि सातत्यानं पार पाडत आहेत अश्या कोरोना योध्दाचा मौलाना आजाद सेवाभावी कडून गौरव करण्यात येत आहे .
22 मार्च जनता कर्फ्यु व त्यानंतर 23 मार्च संचारबंदी ते आजपर्यंत प्रशासनाने घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. या संचारबंदी दरम्यान दैनिक जगमित्र चे बीड जिल्हा प्रतिनिधी शेख ताहेर यांनी लोकांपर्यंत चालु घडामोडी पोहोचाव्या म्हणून विश्वसनीय बातम्या दिल्या. प्रशासनाने घेतलेले निर्णय वेळोवेळी लोकांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न केला. जनतेची गैरसोय होवूनये म्हणून त्यांनी रात्री अपरात्री प्रशासनाने दिलेल्या किचकट आदेशाची सविस्तर बातमी जनतेपर्यंत पोहचण्याचे कार्य केले. लॉकडाऊनच्या काळात जनतेची होणारी गैरसोय याबद्दल त्यांनी सडेतोड लिखान करुन वंचितांना न्याय दिला. तसेच बीड जगमित्र परिवाराच्या वतीने रोज गरिबांना संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या या कार्यामुळे शेख ताहेर यांचा मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अॕड सय्यद अजीम व सचिव अॕड सय्यद मिन्हाजोद्दीन यांनी कोविड योध्दा म्हणून सन्मान करत त्यांना सन्मानपत्र दिले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शेख ताहेर यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान झाल्याबद्दर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.