कोरोना महामारीचा विरोधात आपणास युद्ध जिंकायचे आहे – ठक्करवाड
कुंडलवाडी : देशाचे पंतप्रधान,मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक वारंवार आवाहन करीत आहेत.त्यानुसार आपण गेल्या एक दिड महिन्यापासून या महाभयंकर बिमारी सोबत शक्तीने लडत आहे.लाॅकडाउन,संचारबंदी,शोशल डिस्टन्स,नियमाचे पालनकरीत आपण सर्वांनी दिवस रात्र आपला जिव धोक्यात टाकूनआपल्या देशाबद्दल आपले कर्तव्य बजावत आहेत.अशा परिस्थितीत नागरीकांना आरोग्य सेवा देत आहेत या बद्दल मी या भागाचा जिल्हा परिषद सदस्य यानात्याने आपले आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आलो आहे.अशाच पद्धतीने पुढील काळातही कोरोना महामारीचा विरोधात आपणास युद्ध जिंकायचे आहे.असे लक्ष्मणराव ठक्करवाड आरळी जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष रूग्ण कल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी यांनी प्रतिपादन केले.ते कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची विचार पुस करण्यासाठी आले होते.यावेळी सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार,डाॅ.जी.एच.वाडेकर,तालुका आरोग्य अधिकारी,रामलू लखमावाड,तालूका आरोग्य प्रवेक्षक,डाॅ.बालाजी सातमवाड वैद्यकीय अधिकारी कुंडलवाडी,पत्रकार मोहम्मद अफजल,नागोराव लोलापोड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठक्करवाड म्हणाले कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थितीत डाॅ.बालाजी सातमवाड आल्यापासून बदलून गेली कुंडलवाडी शहरसह परिसरातील पाच उपकेंद्रातील रूग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवाव ते देत आहे.या पुर्वी येथील परिस्थितीत वेगळी होती.येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहे त्या बद्दल आपणास माझा नमस्कार तसेच कही अडचण असेल तर सागा अशी सर्वांची विचारपुस करीत ते म्हणाले भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की पक्षा तर्फे आमची दररोज पि.सी.होते.त्यात आपण आपल्या भागातील डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी यांची विचार पूस करणे आवश्यक आहे.तसेच आपल्या भागात एक ही व्यक्ती या कोरोनाचा काळात उपाशी राहूनये म्हणून त्यांची काळजी घेतली जाते.म्हणून आम्ही तालूक्यातील जिवनावश्यक वस्तूचे 1500 किट ज्यांना शासनातर्फे कसल्याच प्रकारे अन्नधान्य मिळाले नाही.त्यांना वाटप केले.केंद्र शासनातर्फे जनधन खातेदारांचा खात्यात पैसे जामा करण्यात आले.ते पैसे खात्यातू जानार नाही पण बॅंकेत गर्दी दिसायला मिळते.या सोबत नागरीकांना सहज असे वाटत आहे की आपले मुले भाऊ बहीन संगे सबंधी आपल्या सोबत राहावे.पण आपले कर्तव्य समजून आपण ज्या ठीकाणी आहे.त्या ठिकाणी राहणे आवश्यक आहे. ते त्या ठिकाणी सुरक्षित आहे आणि मी याठिकाणी असा विचार करावा लागेल.असे पण त्यानी यावेळी नागरीकांना संबोधून सागितले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील या कोरोना विषाणू संदर्भात पुरेपूर आभ्यास करून जो लाॅकडाऊन चा निर्णय घेतले त्यामुळे आपल्या देशाची आज परिस्थितीत चांगली व आपण सुखी दिसत आहे.तरी आपण सर्वजन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागृत असने आवश्यक आहे.असे म्हणाले.यावेळी लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्यातर्फे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सातमवाड,पोलीस अधिकारी सुरेश मान्टे वशत्यांचे पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचा-यांना मास्क,सेनेटायझर वाटप करण्यात आले.यावेळी ए.एच. मुंडे आरोग्य साह्यक, सि.एन. जाधव आरोग्य साह्यक,श्रीपती गटुवार सुपरवायझर,सावंत सिस्टर,देवकाबळे सिस्टर निता पडलवार सिस्टर एस.जी अमेटवार औषध निर्माण अधिकारी कदम पाटील नागापुरकर चालक,गायकवाड एम.एन,तैसीम बाई, देशमुख,पवार एन.एम,शेख के.एम,बगाटे,एम.जी’आचेगावे,साईनाथ गुडमलवार,गंगाधर मंदेवाड,व प्रशिक्षणासाठी आलेले सर्व आरोग्य सेविका आदी उपस्थित होते. |