कोरोना बाधीत रुग्णावर जिल्हा शासकीय रूग्णालयात पहिली डायलिसिस यशस्वी…!
बीड : कोरोना बाधित रूग्णावर पहिली डायलिसिस प्रक्रिया जिल्हा शासकीय रूग्णालयात यशस्वी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले आहे.
32 वर्षीय धारूर येथील कोरोना बाधित रूग्णाला किडनी वरील आजार असल्याने डायलिसिसची करण्यात आले. जिल्हा रूग्णालयात डॉ.मनोज मुंडे यांनी डायलेसिस तंत्रज्ञ किशोर दुनघव, परिचारिका स्वाती गव्हाणे आणि कक्षसेवक बलभीम माने यांच्यासह डायलिसिस प्रक्रिया यशस्वी केली.