कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 153 तर दुसरा बळी, आज 25 अहवाल पॉझिटिव्ह
जालना (प्रतिनिधी) – कोरोना या संसर्गजन्य आजाराने जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले असतांना नागरीक गर्दी करतांना दिसून येत आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येते की विनाकारण घराबाहेर पडू नका काम असल्यास बाहेर पडा परंतू येथे एैकण्याची मानसीकता कोणामध्ये नाही त्यामुळे हे संकटात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच समाधानाची बाब म्हणजे आता पर्यंत जिल्ह्यात 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली
तसेच आज शहरातील एका 60 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा जालना जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे.
दरम्यान, आज मंगळवारी सकाळी तब्बल 25 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 153 वर पोहचली आहे. आज मंगळवारी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यामध्ये परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 8,बदनापूर 2,जालना तालुक्यातील सामानगाव येथील 3,पिरपिंपळगाव 1,जाफराबाद 1,यावलपिंप्री 1,जालना शहरातील लोधी मोहल्ला 1,नवीन जालना भागातील यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या एका नामांकित खाजगी रुग्णालयाशी संबंधित 1,गांधीनगर 1,व्यंकटेश नगर 1 ,लक्ष्मीनारायणपुरा 1 या प्रमाणे असून शहरातील मोदीखाना भागातील एका 60 वर्षीय पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.एकूण 73 संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असून आतापर्यंत 49 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.