कोरोना पॉझिटिव्हांना लपविणाऱ्यावर गुन्हे दाखल करा ; खुर्शीद आलम
बीड : कोरोना महा मारीने महाराष्ट्रात थैमान घातलेले आहेत आणि महाराष्ट्रातील मुंबई-पुणे हे टार्गेट केलेले आहे असे असतानाही मुंबई आणि पुण्यातुन अवैधरीत्या आलेल्यांना माजलगाव आणि गेवराई च्या घरात लपवून ठेवण्यात आले होते, लपवून ठेवणारयावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ईतर कोणीही बाहेरून अवैधरीत्या आलेल्यांना लपवून ठेवणार नाही म्हणूनच अशी लेखी मागणी न प.चे माजी स्वच्छता सभापति खुर्शीद आलम यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेबांकडे केली आहे,
निवेदनात पुढे म्हटले आहे की अख्खे जग कोरोना या महा मारी मुळे हादरलेले आहेत याच महा मारीने भारतात ही थैमान घातलेले आहेत, देशातील महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत विशेषता मुंबई आणि पुणे हा कोरोना महा मारीचे केंद्र बिंदु बनलेले आहे हे सर्व जगालाही माहीत आहे असे असतानाही मुंबई आणि पुण्यातुन अवैधरीत्या प्रवास करून बीड जिल्ह्य़ातील टाकरवन ता.माजलगाव आणि इटकुर ता.गॅवराई मध्ये राहत आलेल्या त्या रुग्णांची सुचना पोलिसांना किंवा आरोग्य विभागाला न देताच स्वत च्या घरातच लपवून ठेवत कोरोना महा मारीला निमंत्रण दिले गेले आहे, त्यांच्या अश्या चुकी मुळे बीड जिल्ह्ल्य़तील शासन प्रशासनाने घेतलेल्या सर्व परिश्रम मेहनत वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि बीकरांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे म्हणून त्या रुग्णांना घरात लपविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण यांच्यावर कायदेशीर केली तर ईतर दुसरे कोणी अशी अवैधरीत्या घरात ठेवणार नाही म्हणून रूग्णांना लपविणाऱ्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी न.प.चे माजी स्वच्छता व आरोग्य सभापती खुर्शीद आलम यांनी जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कडे केली आहे