*कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या लढ्यास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून बकळटी* *स्वाराती रुग्णालयास म्युकरमायकोसिस वरील सर्जरी साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एंडोस्कोपी युनिट, 19 सिरिंज इन्फ्युजन पंपांसहित 88 लाखांचा निधी*

अंबाजोगाई (दि. 08) —- : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना करताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य यंत्रणांना बळकटी देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. पोस्ट कोविड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास ना. मुंडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोर 19 सिरिंज इन्फ्युजन पंप खरेदी करण्यासाठी असे मिळून 88 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करताना आवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात 42,782 यु एस डॉलर्स इतकी किंमत आहे. या युनिटसह 9.36 लाख रुपये किंमतीचे 19 इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकूण 88 लाख रुपये निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या 90 रुग्णांवर 115 शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, बीड सह, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घ्यायला येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्वाराती हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्वच टीमचे ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरी साठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट सारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिल्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे डॉ. सुक्रे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *