कोरोना पसरतोय : बीडमध्ये आणखी चार पाॅझिटीव्ह

बीड : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आज सोमवारी सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या 67 पैकी 4 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व बाधित बीड शहरातील छोटी राज गल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. बीडमधील रुग्ण संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण आहे.

बाधीत रुग्णांमध्ये 30 वर्षीय महिला, 38 तसेच 27 वर्षीय पुरुष आणि 10 वर्षीय बालकाचा समावेश आहे. सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे दोन जण कोरोना मुक्त झाले असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. दरम्यान आज त्याच्या रुग्णांचं जिल्ह्यात निष्पन्न झालेल्या बाधित रुग्णांची संख्या आता 116 झाली असून यात 82 हून अधिक जणांना डिस्चार्ज मिळाला आहे तर आता 32 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाईचा शून्य कायम :
बीडमधील एका लग्नात वधूचा भाऊ कोरोना प्रभावित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अंबाजोगाईतील 19 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येऊन सोमवारी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने अंबाजोगाईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. अंबाजोगाई तालुक्याने आपला शून्य कायम राखला असून अद्याप तालुक्यात एकही कोरोना प्रभावित व्यक्ती आढळून आलेला नाही.

272 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *