कोरोना जनजागृतीसाठी,पोलीस व पत्रकार घेणार पुढाकार…!!

कुंडलवाडी : कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दि.17 जून बुधवार रोजी सायंकाळी 5=00 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याचे सपोनी.सुरेश मान्टे यांनी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योनजना व युक्ती,विचार विनिमय चर्चा करण्याचा हेतूने शहरातील पत्रकारा सोबत बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी सपोनी.मान्टे यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने लाॅकडाउन मध्ये काही प्रमाणात स्थिलता दिली.पण नागरीक याचा गैरफायदा उचलत असल्याचे चित्र दिसायला मिळत आहे.आठवडी बाजार भरविण्याची परवानगी नसताना मुख्यबाजारासह,प्रभाग पाच मधील बागवान गल्ली व जोडमारोती मंदीर परिसरात भाजीपाला विक्री करणारे व ईतर किरकोळ व्यापारी शासनाचे आदेशाचे उल्लंघन करीत दुकाने थाटत शोशल डिस्टन्स,संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत मास्क चा वापर न करता बिनधास्त मुख्यबाजरा सह गल्लीबोळीत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.नगर परिषद व पोलीस प्रशासनाचा निदर्शनास येताच सबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.पण कारवाई यावर उपाय नसून नागरीकांनी लाॅकडाउन,संचारबंदी नियमाचे पालन करीत
मास्कचा वापर करीत दैनंदिन जीवनात वावरावे.कारण जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.7 किमी.अंतरावर बिलोली तालूक्याचा ठिकाणी कोरोना रूग्ण सापडत आहे.यासाठी आपण व आपला परिवार व आपला मोहल्ला व शहर कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांचा कालावधीत नागरीकांनी कोरोना सोबतची लढाई कशी लढावे,कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावे.या बाबत सर्व सुचना व त्यांचे पालन कशा पद्धतीने करावे विविध माध्यमाचा मदतीने सागिण्यात आले आहे.तरी नागरीक मला कोरोना होणार नाही असे समजून बिनधास्त वावरत आहेत.यासाठी पुन्हा नागरीकात जनजागृती करण्याचा उद्देशाने कुंडलवाडी पोलीस व शहरातील पत्रकार शहरातील,चुंगीनाका,नवीन बस्थानक परिसर, मुख्यबाजार,विविध प्रभागातील चौकात पोस्टर्स,बॅनर लावण्याचे निर्णय घेण्यात आले.तसेच नागरीकांना शोशल डिस्टन्स,संचारबंदी कायद्याचे पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करणे मास्क चा वापर करण्यास प्रोत्साहन मार्गदर्शन व ते किती आवश्यक असल्याचे समजावून सांगण्यास पुढाकार घेऊन जनजागृती करणे अशी चर्चा करण्यात आले.
कोरोना जनजागृती संदर्भात शहरातील सर्व पत्रकार पोलीस प्रशासना सोबत आहे.असे आश्वासन दिले.
या बैठकीत पत्रकार मोहम्मद अफजल,कल्याण गायकवाड,गणेश कत्रुरवार,सय्यद ईस्तेहाक अल्ली,
कुणाल पवारे,नागोराव लोलापोड,सुभाष दरबस्तेवार,अशोक हक्के,हरिष देशपांडे अमरनाथ कांबळे,माधव हळदेकर,राजू लाभशेटवार,संतोष चव्हाण,शेख शमशोदीन,वसंत मदिकुंटावार,सिद्धार्थ कांबळे,रूपेश साठे,दिगांबर लाडे,लिंगुराम पय्यावार आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *