बीड जिल्ह्यात कोरोना चा कहर सुरूच ; आणखी ०४ पाॅझिटिव्ह..!
बीड : जिल्ह्याला कोरोनाचे बसत असलेले धक्के सुरुच असून बुधवारी देखील जिल्ह्यात ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.यात १ वडवणी, १ पाटोदा आणि २ वालीचिखली येथील आहेत यातील व्यक्तींचा प्रवासाचा इतिहास असुन ते मुंबई मधुन आले होते. त्यामुळे आता जिल्हयात असलेल्या कोरोणाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १६ झाली आहे. बीड जिल्ह्यातून बुधवारी ११२ नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नमुन्यांचा समावेश असल्याने सर्वांच्या नजरा अहवालाकडे होत्या. या ११२ मधुन ४ नमुने पाँझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रेडझोन मधुन प्रवास करुन आले आहेत. आता बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १६ झाली असुन जिल्हयाची एकुण रुग्ण संख्या २४ आहे. यातिल एक मयत असुन एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, तर सहा रुग्णांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.