कोरोना ः नगर पालीकेकडून आरोग्य तपासणीस सुरूवात
परतूर (प्रतिनिधी) ः दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून यात परतूर नगर पालीकेनेही कंबर कसली असून कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी पालीकेने नागरीकांच्या आरोग्य तपासणीस सुरूवात केली आहे. बुधवार दि. 03 रोजी मा. आ. सुरेश जेथलिया यांच्याहस्ते इन्फ्रारेड थर्मोमिटरद्वारे या तपासणीचा शुभारंभ करण्यात आला असून प्रत्येक प्रभागात नागरिकांची तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच आजपासून या अभियानाला प्रत्येक्ष सुरूवात होणार असून या मशिनद्वारे नागरीकांचे तापमान तपासले जाणार असून कोरोनावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल या विषयी माहिती नागरीकांना तपासणी वेळी देण्यात येणार आहे.
यावेळी पालिका उपाध्यक्ष अयुब कुरेशी, गटनेते बाबुराव हिवाळे, राजेश भुजबळ, रहेमु सेठ कुरेशी, अजीज सौदागर, नितीन जेथलिया, पालिका प्रशासनाचे संतोष सोनावणे, शिवाजी गुंजमुर्ती यांची उपस्थिती होती. परतूर शहरातील नागरीकांनी तपासणीच्या वेळी नागरीकांनी गर्दी न करता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील मा. आ. सुरेश जेथलिया यांनी उद्घाटन प्रसंगी केले.