कोरोनावर आयुर्वेदिक उपचाराच्या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर – डॉ. कलमूर्गे

 नांदेड : आयुर्वेदिक मध्ये काही वनौषधी असून ते कोरोना या रोगावर उपचार म्हणून वापर करू शकतो असे मत असल्याचे डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी म्हटले आहेत. जागतिक आरोग्य संघटना, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद येस्सो नाईक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अध्यक्ष, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांना ई-मेल, ट्विटर द्वारे याना कोरोना उपचारा संदर्भात पत्र लिहिले असल्याचे कलमूर्गे यांनी सांगितले आहेत. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून सदरील पत्रावर पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवले असल्याचे ई-मेल द्वारे उत्तर आले असल्याचे कलमूर्गे यांनी सांगितले आहे.   यापूर्वी सुद्धा डॉक्टरांना मरणोत्तर आर्थिक मदत देण्यात यावे या मागणीच्या पत्रालाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर आले असून त्यावर योग्य तो निर्णय घेऊन माझ्या मागणीला न्याय मिळाले असल्याचे आनंद कलमूर्गे यांनी व्यक्त केले आहेत.        कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने त्यांच्या विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांचे उपचार करणे म्हणजे मृत्यूच्या दारात जाणे, असे असतानाही डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. चरकसंहिता, अथर्ववेद आणि सुश्रुतसंहितेत या नीरब्राह्मीचा उल्लेख ब्राह्मी असा केला गेला असल्यामुळे तिला देखील ब्राह्मी म्हटले जाते. प्राचीन काळात वेदांचा अभ्यास करणारे अभ्यासक स्मरणशक्ती वाढविण्यासाठी या वनस्पतीचा वापर करीत, असा उल्लेख आहे. तिच्या सेवनाने मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि कंपवाताच्या (पार्किनसन) विकारांसारखे विकार टाळता येऊ शकतात, असे काही संशोधनांतून निदर्शनास आले आहे. औषधी वनस्पती आहेत, ह्याचे त्याला ज्ञान झाले. भारतीय ऋषि-मुनींनी प्राचीन काळापासून अनुभवसिद्ध हमखास गुण देणाऱ्या व भारतातील हवामानात चांगल्या रीतीने वाढणाऱ्या  वनस्पतींचे जतन केले. त्यांची वर्णने व उपयोग ह्यांच्या सूत्रबद्ध रचना केल्या. ऋग्वेद, आयुर्वेद व त्यानंतर चरकांचा कालखंड ह्या काळात औषधींविषयक माहितीचा आणखी आविष्कार होत गेला. चरक व सुश्रुत ह्यांचा कालखंड तर वनौषधींचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे. चरकसंहितेमध्ये सातशेच्या वर औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. त्यामध्ये ब्राम्ही, जटामांसी, आम्लकी, अश्वगंधा, वचा, शंखपुष्पी या औषधांच्या संयुक्त मिश्रणाने मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढतो आणि कुठलेही विषाणू शरीरात प्रवेश करू नये यासाठी प्रतिकार करीत असतात. अश्वगंधा या औषधाने मानसिक तणाव दूर करण्यासाठी मदत होते. आम्लकी या औषधाने सर्दी, खोकला सारख्या रोगावर प्रभावी औषध म्हणून वापर करता येतो. ब्राम्ही या वनस्पतीत भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतो आणि कर्करोग सारख्या पेशींना नष्ट करण्याचा काम करते. आयुर्वेदिक मतानुसार जटामांसी मधुर, पाचक असते.  यासोबतच कुष्ठ, रक्तविकार, त्वचा रोग, ज्वर, अरुचि, दाह, आंतों की सूजन, मूत्र रोग, रक्ताभिसरण क्रियाची खराबी, पीलिया खूप गुणकारी औषध आहे. वचा हे छातीतील खरकरपणा, श्वास घेण्यास त्रास, यकृतात जळजळपणा, खोकला कमी करण्यास मदत करतो. श्वासनक्रियाच्या ऍलर्जी आजारही कमी करण्यास मदत करतो. मानसिक दुर्भलता सोबतच शारीरिक अशक्तपणा दूर करण्यास शंखपुष्पी मदत करते. अशाप्रकारचे औषधी गुण आहेत, त्या औषधींचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास असल्याचे डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *