कोरोनाच्या सावटाखाली बीड जिल्ह्यात ईद साजरी..!
बीड : गेल्या दोन-अडीच महिन्यापासून अवघा देश कोरोना च्या सावटाखाली असल्यामुळे सन वार अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करावे लागत आहेत. मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र रमजान ईद अत्यंत साध्या पणे जिल्ह्यात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी आपल्या घरीच ईद-उल-फित्र ची नमाज अदा केली महिनाभरात रोजे ( उपवास ) ठेवल्यानंतर सोमवारी दि.25 रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने ईद-उल-फित्र रमजान ईद साजरी करण्यात आली कोरणा विषाणूचा संसर्ग व लाॅकडाउन च्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मुस्लिम समाजाने प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार यंदाची ईद अगदी साध्या पद्धतीने आपल्या घरच्या घरीच नमाज अदा करून साजरी केली. दरवर्षी रमजान ईद च्या दिवशी मुस्लिम समाजाच्या वतीने ईदगाह येथे सामूहिक नमाज पठण केले जाते. मात्र यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण न करता नागरिकांनी आपल्या घरीच नमाज अदा करून कोरोना च्या विळख्यातून देश लवकरच मुक्त व्हावा अशी दुवा ( प्रार्थना ) केली नमाज नंतर गळाभेट टाळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या..