कोरोनाच्या आजारामुळे अनंत देशमुख यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : न्यू हायस्कूल थर्मल परळी येथील सहशिक्षक अनंत बालासाहेब देशमुख (मोहेकर) यांचे कोरोना या आजाराने दि.२६ सप्टेंबर रोजी निधन झाले. मृत्यू समयी वय ४५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई व भाऊ असा भरगच परिवार आहे. अनंत बालासाहेब देशमुख (मोहेकर) हे कोविड १९ साठी पंचायत समिती परळी येथे आरोग्य विभागात कर्तव्य बजावत असताना दि.१२.९.२० रोजी कोरोना बाधित आढळल्याने अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी ऍडमिट झाले व उपचार सुरू असतानाच दि.२६.९.२० शनिवार रोजी संध्याकाळी ८.०० च्या दरम्यान दुःखद निधन झाले. परिवारातील जबाबदार अशा सरांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे. या दुःखात राष्ट्रवादी शिक्षक संघटना सहभागी आहे. कर्तव्य बजावत असताना करोनाची बाधा झाल्यामुळे शिक्षण विभाग व शासनाने याची दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.