कोठारी फास्टनर्सच्या गोदरेज दालनाचा उद्या शुभारंभ
परळी (प्रतिनिधी-) फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्री आणि सेवेमध्ये मागील 35 वर्षापासून कार्यरत असलेल्या रतन कोठारी यांच्या कोठारी फास्टनर्स या गोदरेज दालनाचा शुभारंभ बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून परळी शहर व परिसरातील ग्राहकांसाठी अत्याधुनिक वस्तूंचे भव्य-दिव्य दालन रुजू होत आहे. दरम्यान, ग्राहकांनी दिलेल्या अमूल्य प्रतिसादामुळे आम्ही आणखी नवे काही देण्याचा प्रयत्न करीत असून नागरिक आम्हाला प्रतिसाद देतील असा विश्वास संचालक रतन कोठारी यांनी व्यक्त केला आहे. परळी शहरात गोदरेज इन्स्पायर हब हे नवे अत्याधुनिक दालन कोठारी फास्टनर्स च्या माध्यमातून बुधवार दि. 21 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. औद्योगीक वसाहत परिसरात शिवाजी चौक-वैद्यनाथ मंदीर मार्गावर गोदरेजचे नवे दालन सुरु होत आहे. रतन कोठारी आणि कोठारी बंधूंनी कोठारी सेल्स कॉर्पोरेशन, रामा सेल्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून परळी सोबतच औरंगाबाद, लातूर, नांदेड येथे सेवा दिली आहे. कुलर आणि फर्निचरच्या उत्पादन, विक्री सेवेमध्ये मराठवाड्यात कोठारी सेल्स कॉर्पोरेशन प्रसिद्ध असून आता गोदरेज सोबत नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत कोठारी फास्टनर्स या नावाने नव्या हब चा शुभारंभ येत्या बुधवारी होत आहे. दरम्यान, उद्घाटन औपचारिकरित्या होत असून ग्राहकांनी नव्या दालनास भेट द्यावी, असे आवाहन रतन कोठारी यांनी केले आहे.