केविड 19 समूह उच्चाटनसाठी नागरीकांची आरोग्य तपासणी
कुंडलवाडी (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार शहर व परिसरातील केविड 19 विषाणू समूह उच्चाटनसाठी तपासणी पथक प्रत्येक नागरीकांचा घरी भेट देवून आरोग्य तपासणी करणार असून यात मानव शरीरातील तापमान स्कॅनींग व ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे तपासणी करने याबाबत दि.24 जुलै रोजी नगरपरिषद कार्यालयात येथे जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून न.प.मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे उपस्थित होते तर मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड होते.यावेळी उपस्थित 40 ते 50 प्रशिक्षणार्थीं शिक्षकांना डाॅ.सातमवाड नागरीकांची आरोग्य तपासणी संदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण दिले.शहरात नागरीकांचे आरोग्य तपासणीसाठी आठ पथक वार्ड निहाय तैयार करण्यात आले.या सबंधी नियोजन करण्यात आले.एका पथकात चार शिक्षक राहणार यातील तीन शिक्षक तपासणी करणार तर एक सुपरवायझरींग करून रूग्णांची ऑनलाइन माहिती वरिष्ठ कार्यालयात पाठविले जाणार यासबंधी नागरीकांची 25 जुलै पासून तपासणी प्रक्रिया सुरूवात करण्यात आले आहे.अशी माहिती डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.
नागरीकांनी शहर व परिसरातून केविड 19 विषाणूचा समूह उच्चाटनसाठी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावे व तपासणी पथकास सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी केले.