केळगाव येथे देशी दारुचे अवैध धंदे जोरात सुरु पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष
आमठाणा : सिल्लोड तालुक्यातील केळगाव रस्त्यावर अवैध देशी दारु विकली जात आहे दारुचा परवाना नसतानाही देशी दारुची विक्री होत आहे कुणाचीही भीती न बाळगता अवैधरित्या चालणारे धंदे देशी दारू खुलेआम सुरू आहे केळगाव हे मोठे बाजार पेठेचे गाव आसुन गावाला चार ते पाच खेडे लागुन आहे या परिसरात सध्या देशी दारुचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आसुन भर चौकामधे देशी दारुची विक्री केली जात आहे त्यामुळे नागरीकानां ञास सहन करावा लागतो अवैध रित्या चालनार्या धंद्याना आळा कधी बसनार आसा प्रश्न निर्माण झाला आहे गावामध्ये सरकार मान्य देशी दारूची दुकान नाहीत अवैध धंदा करनारे दिवस राञी दुकान चालु असते बिनधास्त आपली दुचाकीवरुन देशी दारु घेऊन येतात कुणाची भिती न बाळगळता बिधास्तपणे आणतात लोकांना एक बाटली शंभर रूपायाना विकतात बाटलीची मुळ किमंत बावन रू आहे एका बाटली मागे आठ्येच्याळीस रू काढतात असे अवैध धंदे करणायांना कोनाचीही भिंती वाटत नाही सध्या ओला दुशकाळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत अशी व्यवसाय धारक मात्र आपली पोळी भाजून घेत आहे सामान्य नागरिक मात्र व्यसनाच्या आहारी जात आहे. केळगावात विनापरवाना देशी दारु दुकाने सुरु आहेत सामान्य जनतेची लुट होत आहे या प्रकारामुळे पोलिसाच्या कामगिरीवर प्रशनचिन्ह उपस्थित होत आहे सुरु असलेल्या अवैध धंद्याना लगाम कधी लागणार असा प्रशन निर्माण होत आहे अवैध रित्या चालनार्या धंद्याना मात्र संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजरोस पणे खुलेआम व्यवसाय चालू आहेत. देशी दारुचे अवैध धंदे बंद करण्यात यावे आशी मागणी नागरिकांमधून होत आहे.