केळगाव मध्यम प्रकल्पात पहिल्याच पावसात 70%जलसाठा

आमठाणा (प्रतीनीधी) – सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळना नदीवर असलेल्या केळगाव धरणात मागील वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुध्दा धरण परिसरात मध्ये चांगला पाऊस झाला होता त्यामुळे धरणांत सुध्दा 100 %जलसाठा उपलब्ध झाला होता केळगाव धरणात  गुरुवार व शुक्रवार रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे केळगाव धरणाचे पातळी 70% वाढ झाली आहे  मागील वर्षी सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती संपूर्ण तालुक्यात केवळ याच धरणात मुबलक पाणी साठा होता मागच्या वर्षी या धरणातून ट्रकरने जवळपास 30ते 35 गावांची या धरणातून तहान भागवली मात्र या वर्षी सुध्दा मागील चार पाच दिवसापासून धरण परिसरात पावसाने चांगली कृपा दाखवल्या मुळे धरणाचं साठा 70 %पाणी साठा झाला आहे या मध्ये मागील साठा 7%होता आणखी सुध्दा पाण्याचा ओघ सुरू आहे. परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आणि पाणी टंचाई गावांना दिलासा मिळाला आहे मात्र आता धरण परिसरात अवैध पाणी उपसा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे या धरणावर आता पर्यत अनेक शासकीय कर्मचार्‍यांनी सुद्धा या तलावाला भेट दिलेले आहे यामध्ये आयुक्त सुनिल केंन्देकर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुध्दा या तलावाला भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *