जालना

केरूर येथील त्या रूग्णास अखेर सुट्टी…

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – काही दिवसापुर्वी बिलोली येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या तालुक्यातील केरूर येथील त्या प्रवासी रूग्णावर उपचार करण्यात आले होते.डाँ.नागेश लखमावार यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसाच्या उपचारानंतर त्या रूग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रूग्णावर पुष्पवृष्ठी करून दि.२८ मे रोजी रूग्णालयातुन सुट्टी देण्यात आली.    तालुक्यातील शंकरनगर येथुन जवळच असलेल्या केरूर येथील एक ३३ वर्षी व्यक्ती हैद्राबाद येथून नांदेड येथे आला होता.नांदेड येथे काही दिवस मुक्काम केला. नांदेड येथे त्या व्यक्तीची स्लँब तपासणी करण्यात आली होती.त्या तपासणीत त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो व्यक्ती आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. अँटोने गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या त्या व्यक्ती नरसी हून केरूरकडे न जाता एका ट्रकने बिलोली गाठून शहरातील नगर परिषदेच्या दुसऱ्या इमारतीवर स्थापन करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल झाला.कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या त्या रूग्णाची तपासणी करून त्याचा स्लँब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.बिलोली येथे घेण्यात आलेल्या स्लँबचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता नंतर चा रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली होती. उपचाराच्या कालावधीत तो कक्ष सोडून बाहेर फिरताना स्वतः पाहिल्याचे   नगरसेवक अंकुशकर यांनी  तहसीलदार यांना कळविले होते. यामुळे शहरातील लोकांना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे काहींनी प्रशासनाला निवेदनही दिले होते. बिलोली शहरात कोरोना येण्यासाठी हा रुग्ण कारणीभूत ठरू नये यासाठी फवारणी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली होती.   केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या त्या रूग्णावर वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांच्या निगराणीखाली योग्य तो उपचार करण्यात येऊन पुन्हा स्लँब तपासणी केली असता केरूर येथील त्या रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यास दि.२८ मे रोजी रूग्णालयातुन पुष्पवृष्ठी करून सुट्टी देण्यात आली.  रूग्ण पुर्णपणे बरा झाल्याने बिलोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून समाधान व्यक्त केली.यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके,तहसिलदार विक्रम राजपुत,तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर,पोलिस निरीक्षक शिवाजीअन्ना डोईफोडे,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर,काँग्रेसचे ता.अध्यक्ष शिवाजी पा.पाचपिंपळीकर यांच्या सह न.प कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *