केज येथे विना मास्क फिरणाऱ्या कडून दंड वसूल !!

केज : येथील पोलीसासह महसुल विभागाने शहरात विना मास्क फिरणाऱ्या कडून ९१ हजार ५०० रूपयाचा दंड वसुल केला. शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी नियमाचे पालन करावे नसता कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार मेंडके यांनी दिला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने नियमावली ठरवून दिली आहे. मात्र या नियमाचे पालन होत नसल्याने जिल्ह्यात रूग्णांच्या संख्येन वाढ होवू लागली. मास्क वापरणे गरजेचे आहे असे असतांना नागरीक मात्र टाळाटाळ करत आहेत. मास्क न वापरणार्‍यांना दंड आकारण्यात येत असून काल अनेकांना मास्क दिसून आले नसल्याने त्यांच्याकडून दंडाची वसुल करण्यात आली. तसेच रिकामटेकडे फिरणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली. शिथीलतेचा कार्यकाळ संपल्यानंतर मोकार फिरणार्‍यावरही प्रशासनाची नजर असते एकूणच शंभर ते दिडशेपेक्षा जास्त नागरीकांना पोलीस, महसूल प्रशासनाने ९१ हजार ५०० रूपयाचा दंड आकारला. ही कारवाई तहसीलदार दुलाजी मेंडगे, सीओ विशाल भोसले, पोलीस निरीक्षक त्रिभुवन यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *