कृष्णपुरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनिता राजेंद्र आरेकर व उपसरपंच मंदा तुकाराम जगदाळे यांची निवड
घनसावंगी प्रतिनिधी कैलास पवार तालुक्यातील कृष्णपुरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनिता राजेंद्र आरेकर व उपसरपंच मंदा तुकाराम जगदाळे यांची निवड करण्यात आली. कृष्णपुर ग्रामपंचायत निवडणुकीत राजेंद्र आरेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या सात पैकी सात उमेदवार विजयी झाल्याने सदरील पॅनल ला स्पष्ट बहुमत मिळाले.सरपंच पदाची निवडणूक बुधवारी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थित नव निर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सुरेखा विष्णु हगवने,बापूराव यदा अस्वले,नारायण जगन्नाथ जाधव,अंकुश माणिक चव्हाण,विमल हरिभाऊ जाधव व सर्व गावकरी उपस्थित होते..
