कृषी सेवा केंद्रास सील,दोन दुकानदारांना 10 हजाराचा दंड; मुख्याधिकारी पेन्टे यांची कारवाई
कुंडलवाडी (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानव्ये जिल्हात कडक लाॅकडाउन पाळण्यात येत असून परवानगी पात्र कृषी सेवा केंद्र सकाळी 7=00 वाजेपासून दुपारी 2=00 वाजे पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश असतांना या व्यतिरिक्त जास्त वेळ कुंडलवाडी शहरातील तीन कृषी सेवा केंद्र चालक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले व्यवसाय चालू ठेवल्यांचे मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्या निदर्शनास आल्याने यातील माऊली कृषी सेवा केंद्र व शिवकृपा कृषी सेवा केंद्र या दोन कृषी सेवा केंद्र चालकास प्रत्येकी 5 हजारचा दंड तर दत्तकृपा कृषी सेवा केंद्रास सील करण्याची कारवाई करण्यात आले आहे.यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा व्यतिरिक्त जास्त वेळ कृषी सेवा केंद्र चालू ठेवणा-यांचे धाबेदनावले.या कारवाई मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,लिपीक गंगाधर पत्की,मारोती करपे,जनार्दन करपे,लेखपाल,अभियांता सिरसाठ,धोंडीबा वाघमारे आदींचा समावेश होता.अशी माहिती मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्याकडून प्राप्त झाले.
कुंडलवाडी शहरातील व्यापारी व नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करीत.दि.12 जुलै ते 23 जुलै पर्यंत कडक लाॅकडाउन/ संचारबंदी नियमाचे पालन करावे.घरीच रहा.सुरक्षीत रहा,अत्यावशक कामा शिवाय घरा बाहेर पडुनका,सार्वजनिक ठिककाणी मास्क चा वापर करा.शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करा,मास्क न लावणार्याना व नियमांचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशारा मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्या वतीने देण्यात आले आहे.