कृषी कायद्या विरोधात भारत बंदला रांजनित उत्स्फूर्त प्रतिसाद..
घनसावंगी (प्रतिनिधी) कैलास पवार
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे आज भारत बंद आवाहन ला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन सगळीकडे वातावरण शुकशुकाट दिसुन येते. भाजीपाला , फळे, दुकाने इत्यादी बंद असल्यामुळे नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे. सदरील कायदा हा काळा कायदा म्हणून त्याच्या निषेध करताना शेतकरी वर्ग हा भारत बंद मध्ये सहभागी झाला आहे.. केंद्र सरकारच्या जाचक कृषी कायदे रद्द करण्यासाठी पुकारण्यात अल्याला देशव्यापी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. कृषी कायदे हे शेतकऱ्यासाठी जाचक ठरू लागले आहेत. शेतकऱ्यासाठी मारक आणि भांडवलदारांच्या हिताचे असल्याने हे कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी होत आहे
