कुडलवाडीकरांनो सावधान…! बिना मास्क व डबलसीट फिरणाऱ्या महाशयांवर होणार कारवाई – मुख्याधिकारी

कुंडलवाडी : शहरात नगर परिषद प्रशासन,पोलीस प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करून ही काही नागरीक भाजीपाला,किराणा आदी खरेदी करण्याचा बाहाना करीत गल्लीबोळीत,
मुख्यबाजारात शोशल डिस्टन्स,संचारबंदी,
लाॅकडाउन कायद्याचे उल्लंघन करीत विना मास्क टू व्हीलर्स वर डबल सीट फिरत असल्यांचे नगर परिषद मुख्याधिकारी यांना निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी 200 रू.प्रमाणे दंड आकारण्याचा आले.एका दिवसात या दंडात्मक कारवाईत 8000 रू.दंड वसूल करण्यात आल्यांची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्याकडून प्राप्त झाली.
या कारवाईत नगरपरिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे व नगरपरिषद कर्मचारी आदिंचा समावेश होता.
यावेळी मुख्याधिकारी पेन्टे शहरातील नागरीकांना आवाहन केले की नागरीकांनी घरात सुरक्षित राहावे.विनाकारण घराबाहेर पडूनये,महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघा,मास्क चा वापर करा,शोशल डिस्टन्स,संचारबंदी,लाॅकडाउन कायद्याचे पालन करा.अन्यथा दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील सुज्ञ नागरीकतर्फे विना मास्क शोशल डिस्टन्स,संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करना-यावर नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावे.अशी मागणी केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *