कुंडलवाडी येथे कोरोना चैनब्रेकसाठी स्वघोषीत लाॅकडाउन

उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांचा पुढाकार 

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – बिलोली तालूक्यात सह कुंडलवाडी शहरात कोरोना रूग्ण आढळत असल्यामुळे शहरातील नागरीकांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव पासून सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपरिषद उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व व्यापा-यांची बैठक घेवून सर्वानुमते दि.10 जुलै 2020 ते 14 जुलै 2020 या पाच दिवस शहरातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना चैनब्रेकसाठी स्वघोषीत लाॅकडाउन पाळण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. झालेल्या बैठकीत दि.10 जुलै 2020 ते 14 जुलै 2020 या पाच दिवसाचा काळात शहरातील सर्व व्यापारी स्वयंफूर्तीने 100% आपापले प्रतिष्ठाणे बंद ठेण्याचे घोषीत केले.या फक्त वैद्यकीय सेवा,औषधी दुकाने सकाळी 9=00 ते संध्याकाळी 5=00 पर्यंत चालू राहतील तर कृषी सेवा केंद्र व दुग्ध विक्री 9=00 ते दुपारी  2=00 पर्यंत चालू राहतील बाकी सर्व मुख्यबाजारा सह गल्लीबोळीतील प्रतीष्ठाणे बंद ठेवून शहरातील कोरोना चैनब्रेकसाठी  स्वघोषीत लाॅकडाउन पाळण्याचे ठरविण्यात आले.तरी शहरातील सर्व नागरीकांनी कोरोना चैनब्रेक लाॅकडाउनला स्वफूर्तीने सहकार्य करावे.असे आवहान नगराध्यक्षा डाॅ.सौ.अरूणा कुडमूलवार,उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांच्या तर्फे करण्यात आले आहे. या बैठकीस कपडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पंढरीनाथ दाचावार,पानसरे महा विद्यालय उपाध्यक्ष तथा व्यापारी राजेश्वर उत्तरवार,किराणा व्यापारी संघटना अध्यक्ष हणमंतसेठ बेजगमवार,भुसार व्यापारी संघटना अध्यक्ष मैनोदीन हाजी मगदूमसाब,कृषी व्यापारी संघटना अध्यक्ष विलास दिवशीकर,आदीसह शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष,सदस्य दुकानदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *