कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ.बालाजी सातमवाड यांची कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करा – नागरीकांची मागणी

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरातील पाच उपकेंद्रातील लोकसंख्या लक्षात घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी,कायम वैद्यकीय अधिकारी म्हणून डाॅ.बालाजी सातमवाड यांची नियुक्ती करण्यात यावे अशी मागणी कुंडलवाडी व परिसरातील रूग्ण व नागरीकांतर्फे केली जात आहे.
कुंडलवाडी शहर हे नगर परिषद असलेले शहर असून शहरातील लोकसंख्या 24 हजारचा जवळपास व परिसरातील पाच उपकेंद्रातील 26 गावातील एकूण लोकसंख्या 45 हजार चा जवळपास असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिका-यांची मान्यता पदे असून शासनातर्फे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून डाॅ.विनोद माहूरे व डाॅ.गणेश वडजे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दोन ते तीन शे रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात मंगळवार व शुक्रवार आठवडी बाजार दिवस असल्याने चार ते पाच शे रूग्णांची तपासणी व त्यांवर उपचार केले जाते.रूग्णांची संख्या पाहता नियुक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनोद माहूरे व डाॅ.गणेश वडजे यांच्या कडे अनुभवाचा आभाव दिसायला मिळतो असे नागरीक बोलून दाखवत आहे.या ठिकाणी जेष्ठ व अनुभवी वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे.यामुळेच शहर व परिसरातील रूग्ण संख्या व त्यांच्या आरोग्यास योग्य पद्धतीने उपचार मिळावे या अनुषंगाने आरळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या प्रयेत्नांने गेल्या दिड ते दोन वर्षा पासून कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ.बालाजी सातमवाड रूग्णांना सेवा देत होते.ते येथील रूग्णांची सेवा जनसेवा हिच ईश्वर सेवा म्हणून 24 तास रात्र दिवस करीत असल्याने शहर व परिसरातील नागरीकांचे आरोग्याचा प्रशन सुटले होते.त्यामुळेच जिल्हात कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र कुटूंब कल्याण व कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत अव्वल ठरले जिल्हात बिलोली तालूका अव्वल ठरले.डाॅ.सातमवाड आरोग्य केंद्रास नंदनवन केले.स्वखर्चाने योगधाम कार्यालय बांधून काढले.रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना थाबण्यासाठी शेडची व्यवस्था,वाहान पार्किंग व्यवस्था,प्रवेश दवार कमान बांधुन काढले,परिसरात वृक्षारोपण आदी व्यवस्था करण्यात आले आहे.तसेच रूग्णांना शासनाचा प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देत असे.तसेच
प्राथमिक आरोग्य केंद्र साभाळत बिलोली तालूक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब कल्याण व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करीत असे त्या सोबत धर्माबाद तालूक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कुटूंब कल्याण व कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करीत भेट देत असे.कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी देत असलेल्या सेवेमुळे रूग्ण त्यांना वैद्यकीय अधिका-याचा रूपात देवच आहे असे बोलून दाखत होते.पण गेल्या चार ते दिवसापासून ते तालूक्यातील सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आजारी असल्यामुळे ते त्यां ठिकाणी सेवा देत असल्यामुळे कुंडलवाडी सह परिसरातील पाच उपकेंद्रातील रूग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसल्याने रूग्ण पोरके झाले असे रूग्ण व त्यांचे नातेवाईक बोलून दाखवत आहे.तरी कुंडलवाडी शहर व परिसरातील लोकसंख्या व रूग्ण संख्या आदीचा विचार करून संबंधी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅ.बालाजी सातमवाड यांची कायम निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी कुंडलवाडी शहर व परिसरातील पाच उपकेंद्रातील रूग्ण व नागरीकातर्फे केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *