कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा वाहनचालक पॉझिटिव्ह

पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले*पोलीस ठाणे व परीसर कंटेनमेंट झून म्हणून घोषीत

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेडच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वाहनचालकाचा स्वब अहवाल दि.७ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला.बाधित वाहनचालक ४ जुलै रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या तसेच अन्य नागरिकांच्या संपर्कात आले होते.सद्या ते नांदेड येथे उपचार घेत आहेत. या अनुसरून बिलोली तालूका आरोग्य अधिक्षक डाॅ.नागेश लखमावाड,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड व आरोग्य कर्मचारी आज सकाळी 10=00 वा.दरम्यान पोलीस ठाण्यास भेट देवूनठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे  स्वब तपासणीसाठी घेतले.यावेळी तालूका आरोग्य अधिक्षक डाॅ.नागेश लखमावाड यांनी पोलीस ठाणे व परीसर कंटेनमेंट झून म्हणून घोषीत करीत पालीका प्रशासनास परिसर सील करण्याचे सुचना दिले.पोलीस ठाण्यातील अधिकारी सह पोलीस  क्वारंटाईन करण्यात आले.तसेच आरोग्य कर्मचारी कंटेनमेंट झून मधील लोकांचे आरोग्य तपासणी करीत आहे.याकामी दोन टीम तैयार करण्यात आले आहे.अशी माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड यांच्या कडून मिळाली.
पोलीस ठाणे व परिसर निरजंतूकीकरण करूनकंटेनमेंट झून म्हणून घोषीत करीत सील करण्यात आले.सबंधीतांचे स्वब तपासणीसाठी पाठवीण्यात आले.तेव्हा पर्यंत सबंधीतांना व्यक्तींना के.रामलू मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले.                       

मुख्याधिकारी जी.एस.पेन्ट                                  न.प.कुंडलवाडी

 

मागील लाॅकडाउनचा काळात आपल्या भागात एकही कोरोना रूग्ण नसतांना त्या काळातून आपण शहरवासी कडक नियमाचे पालन करीत सुरक्षित रित्या बाहेर पडलो.सध्या शहर परिसरात कोरोना रूग्ण आढळत आहे.त्यामुळे नागरीकांना स्वताची काळजी स्वता घेणे आवश्यक आहे.नागरीकांनीशोषल डिस्टन्स नियमांचे पालन करावे.हात प्रत्येक वेळी साबनाने धुवावे,सार्वजनी ठिकाणी मास्कचा वापर करा,गरज नसता घराबाहेर पडूनका,भिती बाळगायची गरज नाही.नागरीकांनी स्वताची व आपल्या परिवाराची आरोग्याची काळजी घ्या.                              डाॅ.विठ्ठल कुडमूलवार                            उपाध्यक्ष न.प.कुंडलवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *