कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा वाहनचालक पॉझिटिव्ह
कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेडच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वाहनचालकाचा स्वब अहवाल दि.७ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. आता संपूर्ण पोलीस ठाण्याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी दिली आहे.बाधित वाहनचालक ४ जुलै रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या तसेच अन्य नागरिकांच्या संपर्कात आले होते.संपर्कातील सर्व संशयितांची तपासणी करुन स्वॅब पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. बालाजी सातमवाडयांनी सांगितले.