कुंडलवाडी पोलीसांची कारवाई, विदेशीसह एकूण 28,440 मुद्देमाल जप्त…!!

कुंडलवाडी : कुंडलवाडी चुंगीनाक येथे अवैध विदेशी दारू विना परवाना चोरटी विक्री करण्याचा हेतूने जवळ बाळगून वाहातूक करीत असतांना कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनी.सुरेश मान्टे व सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांच्या निदर्शनास आले व देगलूर तालूक्यातील शाहापूर येथील दोघांना मुद्देमालसह पकडले.
याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की
दि.25 जून रोजी सायंकाळी 4=15 वाजण्याच्या सुमारास येथील धर्माबाद बिलोली रोड वरील चूंगीनाका येथे १) अनिल विठ्ठल सुरकंळे वय ३७ वर्षे आणि २) अशोक राजेंद्र आेसावार वय २१ वर्षे दोन्ही रा.शहापुर ता.देगलुर यांनी संगणमत करून आपल्या मालकीचा हिरो होन्डा मोटार सायकल क्र.एम.एच.26 झे.4293 यावरून दोन खाकी रंगाचा बाॅक्स मध्ये इम्पेरीयल ब्ल्यु व्हिस्की ज्याचा बॅच न.0188 असा लेबल असलेल्या 180 एम.एल.च्या सिलबंद 96 बाॅटल्या एकूण 13,440 किंमतीचा प्रोव्हीजन माल विना परवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याचा उद्देशाने जवळ बाळगून वाहातूक करीत असताना मिळून आले.आणि त्यांच्या जवळील विदेशी दारू किमत 13,440 रू.व मोटार सायकल किमत 15,000 रू. एकूण मुद्देमाल 28,440 जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी सपोनी मान्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 81/2020 कलम 65 ई.मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास बिटजमादार इंगोले करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *