कुंडलवाडी जिल्हा परिषद शाळा 13 जुलै पासून सुरू होणार…!
कुंडलवाडी : येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा दि. 13 जुलै पासून शासनाचा नियमांने अधीन राहून सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापण समिती,मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतले.
दि.26 जून रोजी जिल्हा परिषद हायस्कूल येथे व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत व्यवस्थापण समिती,मुख्याध्यापक,व शिक्षक शासन परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवूनये या शुद्ध हेतूने वर्ग नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना ऑन्लईन व आॅफ लाईन शिक्षण देण्यासाठी शाळा उघडण्याचे सर्वानुमते निर्णय घेण्यात आले आहे.
यासाठी नगर परिषद प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यास तैयार असल्याचे उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे यांनी आश्वासन व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल,मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,शाळा विकास समिती सदस्य नगरसेवक पंढरी पुपलवार,प्रयागबाई शिरामे यांना दिले.
दि.26 जून रोजी झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा होवून ठराव पारीत करण्यात आले.
दि.13 जुलै पासून वर्ग नववी व दहावी सुरू करण्यात येईल,सकाळाचे सत्र 9 ते 12 शाळेची वेळ राहणार,
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेतील वर्ग खोल्या कार्यालय व सर्व परिसर नगर परिषदेच्या सहकार्याने निरजंतूकरण करण्यात येणार,विद्यार्थ्यांना सॅनिटायझर,करण्यात येणार
,हात धुन्यासाठी हॅन्डवाश व साबनाची व्यवस्था करण्यात येणार,पालक आपल्या पाल्यांना स्वताचा जबाबदारीने,स्वईच्छेने शाळेत पाठवावे,एका बाकावर एक विद्यार्थ्यी बसणार,परगावच्या विद्यार्थ्यांना पालक शक्यतो पालक स्वताचा वाहानावर आनून शाळेत सोडावे,मुलांना शाळेत पोषण आहार न देता विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येणार,वर्ग निहाय पाठ्य पुस्तके वाटप करावे,विद्यार्थ्यी शाळेत येताना स्वताची बॅग,पिण्याच्या पाण्याची बाॅटल घरून पाणी भरून आणून घ्यावे,शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यतेरीक्त कोणालाही प्रवेश करू देवू नये,शिक्षक कोरोना प्रवण श्रेत्रातून येण्या ऐवजी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे.
आदी ठराव सर्वानूमते पास करण्यात आले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मोहम्मद अफजल अल्हज म.इब्राहिम शेख,सचिव डी.पी.शेट्टीवार,सदस्य सदस्य नगरसेवक पंढरी पुपलवार,प्रयागबाई शिरामे,शाळेतील शिक्षक
बी.एच.रामोड सर,एस.डी.कमठाणे सर,जी.के.बोईनवाड सर,जियाओदिन ईरफान सर,जुबेरसर,अनवरी मॅडम आदी उपस्थित होते.
एकंदरीत दि.15 जून 2020 पासून शासनातर्फे
नुतन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असे जाहीर करण्यात आले. असून यापुर्वीच कोरोना या जिवघेण्या महामारीने गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले.शासन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश काढले पण ग्रामीण भागातील पालकांकडे अॅनड्राईड मोबाईल आभाव व खंडीत इंटरनेट सेवेमुळे पालक,विद्यार्थ्यांची व शिक्षकांची डोकेदुखी झाली व होत आहे.
त्यामुळे याभागात ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा अडत आहे.असे पालक बोलून दाखवले.ग्रामीण भागातील शिक्षण प्रेमी पालक ऑफलाईन शिक्षणाला पसंती देत आहे.आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तैयार आहे असे बोलून दाखवत आहे.पण नांदेड व कोरोना प्रवण श्रेत्रातून अपडाऊन करणा-या शिक्षकांना प्रथम शासन मुख्यालयास राहणे सक्तीचे करावे.कारण कुंडलवाडी व परिसरात मार्च महिन्यात पासून आज पर्यंत कोरोनाचा एकपण रूग्ण आढळला नाही.हे अपडाऊन करना-या शिक्षकामुळे आमच्या मुलांना कोरोनाचक लागन झाले तर यास जबाबदार कोण असा सवाल पालका समोर उपस्थित होत आहे.