कुंडलवाडीत पुन्हा एक कोरोना पाॅझिटीव्ह

कुंडलवाडी प्रतिनिधी
दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तथा अर्जापूर महाविद्यालयाचे एक पदाधिकारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले त्यांना
उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.
कुंडलवाडी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी तथा अर्जापूर महाविद्यालयाचे एक पदाधिकारी यांना गेल्या दोन तीन दिवसापासून अशक्तपणा सर्दी,ताप अदी जानवत असल्याने ते स्वता अॅटिजन रॅपिड टेस्ट करून घेतले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याने त्यांना
उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.
यामुळे शहरात कोरोनाने पुन्हा एकदा मानवर काढले.
गेल्या एक ते दिड महिन्याच्या पुर्वी शहरातील एक पोलीस कर्मचारी,एक पोलीस अधिकारी यांच्यासह अन्य एक जण कोरोना बाधित आढळले होते.त्यांनी कोरोनावर मात करीत उपचार घेवून सुखरूप घरी परतले.नागरीकांनी 10 जुलै ते 15 जुलै पाच दिवस स्वघोषीत कोरोना चैन ब्रेक लाॅकडाउन पाळले.त्यासह जिल्हाधिकारी रांच्या आदेशाने 12 जुलै ते 20 जुलै चैन ब्रेक लाॅकडाउन पाळले.यामुळे
कुंडलवाडी शहर कोरोनामुक्त झाले.आता दि.१२ आॅगस्ट रोजी शहरातील नरागल्ली भागातील रहिवासी तथा अर्जापूर येथील महाविद्यालयाचे एक पदाधिकारी अॅटिजन रॅपीड टेस्टद्वारे पाॅझिटिव्ह आढळून आले त्यामुळे त्यानी राहात असलेल्या नरागल्ली भागास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केले आहे. तसेच या भागात आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने दिले आहेत. शहराच्या सभोवताली कोरोना रुग्ण आढळत असताना शहरातील मोठ्या प्रमाणात नागरीक कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसायला मिळत आहे.त्यामुळे आतातरी शहरातील नागरिक शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *