Newsनांदेड

कुंडलवाडीत कोरोनाचा सावटात ईद साजरा ; ना गळा भेट ना शिरखुर्मासाठी मित्राना निमंत्रण..!

कुंडलवाडी /अफजल मोहम्मद : कोरोना पार्श्वभूमीवर शहराहत लाॅकडाऊन संचारबंदी कायदा लागू असल्याने मुस्लिम बांधव यावर्षी कोरोनाचा छायेत ना ईदग्यावर नमाज ना सुभेच्या गळा भेट ना शिरखुबा पिण्यासाठी मित्राना निमंत्रण घरातच ईदची नमाज अदाकरून शासनाचा आदेशाचे पालन करीत ईद-ऊल-फित्र सन साजरा केले.
कोरोना मुळे लॉक डाउन च्या दरम्यान मुस्लिम बांधवांना संपुर्ण रमजान महिन्याचे पाच वेळेसचे नमाज व तरावी नमाज त्या सोबत ईदची नमाज मज़ीद मधे न पडता घरीच अदा करावे लागले.तसेच प्रत्येक वर्षी मुस्लिम बांधव घरातील प्रत्येकासाठी नवीन कपडे खरेदी करतात पण यावर्षी लॉक डाउन मध्ये कपड दुकाने चालू करण्यास मनाई होती त्यामुळे नविन कपडे खरेदी पासून वंचित रहावे लागले
शासनाच्या नियमाचे पालन करत मुस्लिम बांधवनी प्रशासनला रमजान महिन्यात सहकार्य केले शेवटी आजच्या ईद साठी प्रशासनाने घरातच ईद ची नमाज अदा करावे.व घरी राहून ईद साजरी करावी असे आहवान केले होते.पोलीस प्रशासनाच्या सुचनेचे पालन करीत मुस्लिम बांधव घरात च आपल्या कुटुबियासोबत ईद साजरी केली
या ईद साठी सर्व समाज बाधवानी सोशल मिडीया चा आधार घेत मुस्लिम बंधवाना शुभेच्छा देण्यात आले आहे. यात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड,नगराध्यक्षा डॉ अरुणा कुड़मुलवार,उपाध्यक्ष डॉ.विठल कुड़मुलवार,डाॅ.बालाजी सातमवाड,
सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार,माजी.नगराध्यक्ष डाॅ.एस.एस.शेंगुलवार,पानसरे विद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार,राजू पोतनकर,डाॅ.हणमंत लखमपूरे,सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी व नगरसेवक,परिवारातील नातेवाईक मित्रमंडळी आदींनी ईद च्या सुभेच्या दिल्या
यावे शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावे यासाठी सपोनी.सुरेश मान्टे यांनी शहरातील मस्जिद सह विविध चौकात,मुख्यबाजारात पोलीस बंदोबस्त तैनात केल्यांचे चित्र दिसायल मिळत होते.
सपोनी.सुरेश मान्टे
पोलीस प्रशासनाच्या हाकेला मुस्लिम बांधव साथ देवून शहरातील कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवून ईदची नमाज घरात आदा करून लाॅकडाऊन,संचारबंदी कायद्याचे पालन करीत रमजान ईद साजरा केले.त्याबद्दल सपोनी.सुरेश मान्टे समाज बांधवाचे आभार मानले.
एकंदरीत कोरोनाचा सावटात मुस्लिम बांधव पुर्ण एक महिना रोजा उपास ठेवून घरातच शासनाचा आदेशाचे पालन करीत घरातच पाच वेळाची नमाज व तरावी नमाज अदा करून ईफ्तार करीत अल्हाची ईबादात केले.पुर्ण महिना लोटल्या नंतर लाॅकडाऊन संपतील मग उत्साहात व आनंदात ईद साजरा करता येईल पण असे न झाले.दिवसें दिवस राज्यात,जिल्हा व तालूक्यात कोरोनाचे रूग्णाची संख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन कायम असल्याने
कुंडलवाडी व परिसरात मुस्लिम समाज बांधव
ईद-ऊल-फित्र ईद ची नमाज ईदगाह यथे एकत्रीत आदा न करता,व्यक्तीक घरातच आदा केले.ना नवीन कपडे खरेदी,ना शुरखूर्मा पिण्यासाठी मित्राना निमंत्रण यामुळे दर् वर्षात जो उत्सव व आनंदात सन साजरा केले जात होते.ते या रमजान ईद सन साजरा करताना दिसून आले नाही हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *