किसान सभेच्या आंदोलनाने चारशे अठरा शेतकऱ्यांना मिळणार पीककर्ज तिसर्या दिवशी आयडीबीआय बॅक प्रशासनाने दिले लेखी पत्र
परळी वै. प्रतिनिधी शासनाच्या कर्जमाफी योजनेतील पाचशे शेतकऱ्यांना आयडीबीआय बॅक प्रशासन तात्काळ कर्ज देण्याचे मान्य केल्याने तीन दिवसा पासुन सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुटले असल्याचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे नेते काॅ. अॅड. अजय बुरांडे यांनी सांगितले. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत माफी मिळालेल्या व नवीन पात्र शेतकर्यांना दत्तक बॅक असलेल्या आयडीबीआय बँकेने तात्काळ पिक कर्ज वाटप करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवार दि 21 पासुन परळी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे नेते अॅड. अजय बुरांडे, काॅ. बालासाहेब कडभाने हे करित होते . तालुक्यातील वाघाळा, कावळेवाडी, नागपिंपरी, गोपाळपुर व माळहिवरा या गावांना आयडीबीआय बॅक दत्तक बॅक आहे. आयडीबीआय बँकेने युती व आघाडी सरकारच्या काळात मिळालेल्या कर्जमाफी च्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बॅक प्रशासन किरकोळ कारणे देऊन टाळाटाळ करित होती. कर्जासाठी पात्र असुनही आयडीबीआय बँकेने शेतकर्यांना कर्जा पासुन वंचित ठेवले होते. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य किसानकिसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा सोमवार दि 21 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पहिल्या दिवशी प्रश्न सुटला नसल्याने मंगळवार दि 22 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. तिसर्या दिवशी (बुधवार दि. 23) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजता आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी श्री दळवी यांनी पाच गावातील सुमारे 418 पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिक कर्ज देण्याचे लेखी पत्र तहसिलदार बिपीन पाटील, नायब तहसीलदार बाबुराव रूपनर यांच्या समक्ष किसान सभेचे अॅड अजय बुरांडे, बालासाहेब कडभाने यांना दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना अॅड बुरांडे यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटी मुळे पिककर्जाचा प्रश्न मिटला असल्याचे सांगितले. शेतकर्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात शशेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी झालेल्या घोषणाबाजी ने तहसिलचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी काॅ. सुदाम शिंदे काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. पप्पु देशमुख, काॅ. विशाल देशमुख, काॅ. मनोज स्वामी, आकाश उबाळे, आण्णासाहेब खडके, भाऊसाहेब डिघोळे, रामप्रसाद नवघरे, आरूण मुंडे, यांच्यासह कावळेवाडी, वाघाळा, नागपिंपरी, गोपाळपुर व नागपिंपरी येथील शेतकरी मोठय़ा संख्येनी आंदोलनात सहभागी झाले होते.