Newsबीड जिल्हा

किरकोळ कारणावरून परळीत तलवार बाजी ; सात जणांना विरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ :कोरोना व्हायरसविरुद्ध आख्ख जग लढत असताना परळीत क्षुल्लक कारणावरून तलवारीनं एकाच नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परळी शहरातील मिलिंद नगरात शनिवारी रात्री ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फारुक खान पठाण असं जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संभाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात तलवार उपसण्यात आली. एवढंच नाही तर चक्क एकाचे नाक कापल्याचा प्रकार घडला आहे. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून तलवारीने रात्री मारहाण केली. तलवारीने फारुखचं नाक कापण्यात आलं. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.
दरम्यान, घरच्या समोरील कठड्यावर बसू न दिल्याचा राग मनात धरून फारुखवर तलवारीने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध सुरु घेत असल्याची तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *