कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची पणन विभागाला विनंती करणार – कृषीमंञी भिसे

कुंडलवाडी (प्रतिनिधी)- तालुक्यातील विजयनगर येथील बंद करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आपण स्वत पणन विभागाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंञी ना.दादाजी भिसे यांनी दुरध्वनी द्वारे दिली.ते बिलोली येथील प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा पञकार गोविंद मुंडकर यांच्याशी बोलत होते.    दिवस राञ शेतात राबराब राबून धान्य पिकविणा-या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी शासनाने हमी भावात शेत माल खरेदी केंद्रे सुरू केली होती.बिलोली तालुक्यातही इतर शेत माला प्रमाणे कापूसाची हमी भावात खरेदी करण्यासाठी तालुक्यातील विजय नगर येथील जिनींग मध्ये हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले होते.हमी भावात कापूस विक्री करण्यासाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची आँनलाईन नोंदणीही केली होती.पिकांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी काहीच शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर येथील हमी भाव खरेदी केंद्राने काही कारणास्तव कापसाची खरेदी बंद केली.विजयनगर येथील खरेदी केंद्राच्या भरोषावर बसलेल्या शेतकऱ्यांना जिनिंग च्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता.तालुक्यातील शेतकऱ्यांकडून हमी भावात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत असताना उप विभागीय अधिकारी,तहसिलदार, जिल्हा उपनिबंधक,सहाय्यक उपनिबंधक आदी अधिकाऱ्यांनी चर्चे अंती बिलोली तालुक्यातील कापसाची आँनलाईन नोंदणी केलेल्या  शेतकऱ्यांचा कापूस धर्माबाद येथे खरेदी करण्याचा निर्णय घेतला .धर्माबाद येथे कापूस विकण्याचा निर्णय दिलासादायक असला तरी यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात वाढ होणारी आहे.बिलोली ते धर्माबाद हे २५ कि.मी चे अंतर असून बिलोली तालुक्यातील अन्य काही गावापासून ते धर्माबाद हे ४० किलोमीटर पर्यंतचे अंतर आहे.शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात होणारी वाढ लक्षात घेऊन प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक तथा पञकार गोविंद मुंडकर यांनी राज्याचे कृषी मंञी ना.दादाजी भुसे यांच्याशी भ्रमणध्वणी द्वारे संपर्क साधला असता ना.भूसे यांनी बिलोली येथे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी स्वत पणन विभागाला विनंती करणार असल्याचे सांगितले व येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बी बियाणे व खतांचा मुबलक साठा असल्याचीही माहिती देत कोरोनाचे संकट टळल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यास स्वत भेट देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *