कर्तव्य दक्ष अधिका-यामुळे गाव सुरक्षित- डाॅ.कुडमूलवार
कुंडलवाडी : राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यासोबत नांदेड शहरात 200 वर कोरोना रूग्णांचा आकडा पोहचला.तसेच आपले शहर तेलंगणा सिमेलगत असतांना सिमावर्ती तेलंगणातील काही गावात कोरोना रूग्ण सापडले पण आपल्या गावात एक पण रूग्ण आढळला नाही.त्या पाठीमागे शहरतील नगरपरिषद मुख्याधिकारी,ठाण्याचे अधिकारी,आरोग्य केंद्रातील अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांनी शहरातील नागरीकांचा सुरक्षितेसाठी घेतलेले परिश्रम होय.या कर्तव्य दक्ष अधिका-यामुळे आपण व आपला गाव सुरक्षित आहे .असे मत दि.12 जुन रोजी नगरपरिषद प्रारंगणात
के.रामलू पब्लिक स्कूल चा वतीने योजीत कोरोना वारियस सत्कार कार्यक्रमा प्रसंगी न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार प्रतिपादन केले.
यावेळी नगर अध्यक्षा डाॅ.अरूणा कुडमूलवार,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड,सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी,सर्व नगरसेवक आयोजक के.रामलू पब्लिक स्कूल अध्यक्ष साईरेड्डी ठक्करवाड,संचालीका रमा ठक्करवाड,
प्रिन्सिपल अभिलाष गोसूला व मुख्याध्यापक अविनाश गुजेवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डाॅ.कुडमूलवार म्हणाले शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात पोलीस अधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी आपले कर्तव्य बजावतांना काही नागरीक त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देत होते पण आज आपल्या शहरात एक पण रूग्ण आढळला नाही.गावातील नागरीक सुरक्षित आहे.आता त्यांना कळून चुकले की त्यावेळी अधिका-यांची सक्तीची भूमिका योग्यच होती. असे कुडमूलवार म्हणाले.
तसेच नागरीकांना यावेळी ते आवाहन केले की आपण पुर्णपणे कोरोना पासून मुक्त झाले नाही.शहरात लोक माक्स वापरत नसल्यांचे चित्र दिसायला मिळत आहे.तरी शहरातील सर्व नागरीक मास्कचा वापर करावे,साबनाने हात धुवावे तसेच शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत दैनंदिन जीवनात वावरावे.असे म्हणाले.
तसेच के.रामलू पब्लिक स्कूल चे अध्यक्ष साईरेड्डी ठक्करवाड,संचालीका रमा ठक्करवाड,प्रिन्सिपल अभिलाष गोसूला व त्यांचे सहकारी यांच्या वतीने आयोजीत कोरोना वारियस सत्कार कार्यक्रमा बद्दल साईरेड्डी सर व त्यांच्या सर्व कर्मचा-यांचे डाॅ.कुडमूलवार कौतूक व अभिनंदन केले.
यावेळी सर्व प्रथम के.रामलू पब्लिक स्कूल चे अध्यक्ष आयोजक साईरेड्डी ठक्करवाड यांनी आपल्या प्रस्ताविकात म्हणाले.शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे व त्यांचे कर्मचारी,वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड व त्यांचे अरोग्य कमर्चारी,सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी व त्यांचे पोलीस कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून आम्हाला घरात सुरक्षित ठेवून ते कोरोना सोबत लढाई लढत होते.त्यामुळे मी व माझा गाव सुरक्षित दिसत आहे.त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्या अनुषंगाने आमच्या संस्थेचा वतीने करोना विरुध्दच्या लढ्यात कार्य केलेल्यां अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव आणी सत्कार नगर परिषद प्रारंगणात आम्ही करीत आहोत.
यावेळी नगराध्यक्ष डाॅ.अरूणा कुडमूलवार यांच्या हस्ते के.रामलू शाळेच्या वतीने
नगर परिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड,
सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी यांचा शालहार श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला.त्यानंतर शाळेचे शिक्षक व शिक्षिकांचा वतीने पुष्प वृष्टी करण्यात आले.
त्यांनतर प्राथमिक आरोग्य केंद्रातीतील कर्मचारी मुंडे ए.एच,आरोग्य सेवक
सौ.गलांडे आरोग्य सेवीका,सौ गायकवाड एम.एन.आरोग्य सेवीका,सौ.साठे एल.डी.आरोग्य सेवीका,सौ.करडे सि.के.आरोग्य सेवीका,सौ.कल्लूरे एस.एम.आरोग्य सेवीका,सौ.मळोदे शितल आरोग्य सेवीका,सौ.वानोळे ए.डी.आरोग्य सेवीका,गायकवाड आर.बी.आरोग्य सेवक,शेख.ए.ए.आरोग्य सेवक,पवळ जे.के.आरोग्य सेवक,ढगे जी.डी.आरोग्य सेवक,सौ.सावंत एस.डी.आरोग्य सेवीका,कदम डि.ए.वाहान चालक,डोकळे एस.एम आदींचा तसेच नगर परिषद कर्मचारी गंगाधर पत्की,हेमचंद्र वाघमारे,मारोती करपे,प्रकाश भोरे,जनार्दन करपे,लेखपाल,अभियांता सिरसाठ,शंकर जायेवार,धोंडीबा वाघमारे,
शुभम ढिलोड,विकास अर्जूने,शिवा खांडरे,अनिल ईटलावार,सर्व सफाई कर्मचारी यांच्या शाळेचे अध्यक्ष साईरेड्डी व संचालीका रमा ठक्करवाड पुष्प गुच्छ देवून सत्कार केले.व पुष्प वृष्टी करण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष शेख जावेद टेलर,नगरसेवक पंढरी पुपलवार,
अशोक पाटील वानोळे,सय्यारेड्डी पुपलवार,सचिन कोटलावार,गंगाप्रसाद गंगोणे,व्यंकट शिरामे,संजय भास्कर,पोशट्टी पडकूटलावार,संजय गोनेलवार,रियाज पठाण म.ईसमाईल,(ईश्शू) आदी सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अभिलाष गोसूला व अविनाश गुजेवाड शिक्षक राजेश कागळे, ईश्वर झपलकर, सपना म्हैसे वाड, विद्या ताटे, शामला किणीकर, गायत्री तुंगेनवार, रमेश कासलोड,अब्दुल शेख आदींनी परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे के.रामलू पब्लिक स्कूल चे अध्यक्ष आयोजक साईरेड्डी ठक्करवाड, संचालीका रमा ठक्करवाड व त्यांचे सहकारी यांच्या वतीने आयोजित करोना विरुध्दच्या लढ्यात कार्य केलेल्यांचा अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव आणी सत्कार कार्यक्रमा बद्दल शहरात कौतूक करण्यात येत आहे.