औरंगाबाद जिल्ह्यात ९००करोनाबाधित
औरंगाबाद: राज्यातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत असतानाच, औरंगाबाद जिल्ह्यालाही या करोना विषाणूच्या साखळीनं विळखा घातला आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ९००वर पोहोचली आहे.
औरंगाबाद शहर परिसरात आज सकाळपासून ३० नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर संध्याकाळपर्यंत आणखी २८ रुग्णांची भर पडली. त्यामुळं जिल्ह्यातील करोनाबाधितांचा एकूण आकडा ९०० वर पोहोचला. औरंगाबाद शहरातील आता सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये कैलास नगरमधील १, चाऊस कॉलनी १, मकसूद कॉलनी २, हुसैन कॉलनी ४, जाधववाडी १, न्यू बायजीपुरा, गल्ली नं. ३ मध्ये १, एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको १, कटकट गेट १, बायजीपुरा १०, अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको २, लेबर कॉलनी १, जटवाडा १, राहुल नगर १ आणि जलाल कॉलनीतील एका रुग्णाचा समावेश आहे. तर यात १६ पुरुष आणि १२ महिला रुग्ण आहेत. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत शहरात दररोज किमान एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.