Uncategorized

औरंगपूर येथे सरपंच पती सह ग्रा पं सदस्यला मारहाण

सिरसाळा : गावातील सार्वजनीक पाण्याच्या टाकी बांधकामावरून झालेल्या वादा मध्ये सरपंच पती सह ग्रा पं सदस्यला मारहाण केल्याची घटना परळी तालुक्यातील औरंगपूर याठिकाणी गुरुवारी दुपारी घडली या प्रकरणी आठ जनांविरुध्द सिरसाळा पोलीस ठाण्यात त्याच दिवशी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सिरसाळ्या पासून जवळच असलेल्या औरंगपूर या ठिकणी ग्रामपंचायत च्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे.
गुरुवारी दुपारी मिस्त्री काम करीत असताना गावातीलच मधुकर उध्दव घडवे, आकाश रावसाहेब घडवे, ज्ञानेश्वर जनार्दन दराडे, हे तिघे त्या ठिकाणी आले बांधकाम बंद कर असे मिस्त्रींना म्हणू लागले.बांधकाम का थांबवताय याचा सरपंच पती शिवाजी कांबळे यांनी जाब विचारला असताना तिघांनीही कांबळे यांच्या सह ग्रा पं सदस्य राधाकिशन दराडे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण करून जखमी केले तसेच राधाकिशन दराडे यांचे सोन्याचे लॉकेट ही हिसकावून नेले.
दरम्यान या प्रकरणी राधाकिशन दराडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून
मधुकर घडवे, आकाश घडवे, ज्ञानेश्वर दराडे, अशोक घडवे, यांच्या सह
सिरसाळ्यातील अनोळखी चारजण अशा एकूण आठ जणांविरुद्ध विविध कलमा खाली सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून
स पो नि श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ अर्जुन मिसाळ हे पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *