ओमराजेंनी मागवली माहिती, रेशन दुकानदारां मध्ये पसरली भाती….
बार्शी:-(सुरज आबाचने) बार्शी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान धारकांना 1 मार्च 2020 ते जुलै 20020 पर्यंत किती धान्य मिळाले व पात्र लाभाथ्र्यांना मागील चार महिन्यापासून योजनानिहाय व युनिटनिहाय किती धान्य वाटप केले. कोणत्या दराने वाटप केले. याबाबतची तपशिलवार माहिती देण्यात यावे.असे पत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नायब तहसीलदार यांना दिले आहे.तसेच योजनानिहाय व युनिटनिहाय धान्य वाटपाबाबतची सर्व तपशिलवार माहिती प्रत्येक ग्रांमपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याबाबत स्वस्त धान्य दुकानधारकांना आदेशित करावे असे आदेश नायब तहसीलदार (पुरवठा) यांना खासदार ओमराजे निंबाळकर यानी पत्रा द्व्यारे केले आहेत.तसेच स्वस्त धान्य वाटपा बाबत तक्रार असल्यास संपर्क साधावा.संपर्क. क्र:-919822754909,02472-225122