ऐश्वर्या राय- आराध्या बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह
मुंबई- शनिवारी रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नानावटी इस्पितळात हलवण्यात आले होते. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची करोना टेस्ट करण्यात आली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचं समजलं होतं. पण आता दोघींच्याही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. जया बच्चन यांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. आरोग्य मत्री राजेश टोपे यांनी यासंबंधीची माहिती दिली.