एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घ्या.

सातारा- ज्येष्ठ पत्रकार,साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे यामागणीसाठी मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री.शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला.
विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपालांकडून लवकरच नियुक्तया करण्यात येणार आहेत.साहित्य,पत्रकारिता,कला,सामाजिक कार्य आदि क्षेत्रातील व्यक्तींचीच या जागांवर नियुक्ती केली जावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे.त्यानुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी एकमुखी मागणी राज्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे.एस.एम.देशमुख यांनी बारा वर्षे लढा देऊन राज्यात पत्रकार संरक्षण कायदा मिळविला..महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की,जेथे पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरविला गेला असून असा हल्ला करणार्‍यांना तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद केली गेलेली आहे.या कायद्याचे जनक म्हणून देशमुख ओळखले जातात.पत्रकार पेन्शन असेल किंवा पत्रकार आरोग्य योजना असताली,नाहीतर छोटया वर्तमानपत्रांचे प्रश्‍न असतील एस.एम.देशमुख याांनी आवाज उठविला आणि पत्रकारांना न्याय मिळवून दिला.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठा लढा देऊन त्यांनी आपले सामाजिक उत्तरदायीत्व देखील पार पाडले आहे,सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी महाराष्ट्रात मोठे काम केले आहे.साहित्य क्षेत्रातही देशमुख यांनी भरीव कार्य केले असून त्यांची आठ पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत.त्यामुळे देशमुख यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घेतले गेले तर राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न तर सुटतीलच त्याचबरोबर समाजाच्या प्रश्‍नांवर देखील ते आवाज उठवतील असा विश्‍वास भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाने शरद पवार यांना दिला.त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शरद पवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव बापुसाहेब गोरे,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्क्ष शरद काटकर,सरचिटणीस दीपक प्रभावळकर,शहराध्यक्ष विनोद कुलकणी,सुजित अंबेकर समाधान पाटील आदिंचा समावेश होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *