एमपीडीए कायद्या अंतर्गत एका वाळु माफीयाची हर्सल कारागृहात रवानगी

केज :- बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुंडगिरीचे व वाळु माफीयाचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्या समोर ठेवुन एमपीडीए कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजले आहेत.* या पुर्वी दोन वाळु माफीया यांना हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक, बीड यांचे सुचनेवरुन पोलीस निरीक्षक श्री.पुरुषोत्तम चोबे, पोलीस ठाणे गेवराई यांनी दिनांक 08/08/2020 रोजी इसम नामे नारायण राधाकिसन भुसारी वय 32 वर्ष, रा. नागझरी ता. गेवराई जि.बीड याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता. सदर स्थानबद्ध इसमा विरुध्द पोलीस ठाणे गेवराई व पोलीस ठाणे गोंदी जि.जालना येथे वाळु चोरीचे, शासकीय नौकरावर हल्ले व मारहानीचे गुन्हे दाखल आहेत. एकुण 10 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसमावर वाळु चोरीचे गुन्हे असल्याने पोलीसांची त्याचेवर करडी नजर होती . सदर इसमावर यापुर्वी सीआरपीसी कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होते. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 19.08.2020 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबध करणे बाबत त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र. 2020/आरबी डेस्क-1/पोल-1/एमपीडीए- 06 दिनांक 19.08.2020 अन्वये आदेशित केले होते. त्या नंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरिक्षक पुरुषोत्तम चोबे यांना दिल्या होत्या. त्यांनी पो.नि.श्री.भारत राऊत, स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली गोपनिय खबऱ्याचे आधारे सदर स्थानबद्ध इसमास नागझरी फाटा ता. गेवराई येथुन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गेवराई येथे हजर केले. त्या नंतर योग्य पोलीस बंदोबस्तात हर्सुल कारागृह, औरंगाबाद येथे दिनांक 20.08.2020 रोजी 03.05 वाजता हजर करुन स्थानबध्द केले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई स्वप्निल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, गेेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, स.पो.नि. राजाराम तडवी , पो.उ.नि. युवराज टाकसाळ पो.स्टे.गेवराई, बीड स्था.गु.शा. चे पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, गेवराई पो. स्टे. येथील नवनाथ गोरे, सुशेन पवार, अंकुश वरपे, आईटवार यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळु चोरी करणारे व वाळुचा चोरटा व्यापार करणारे जास्तीत जास्त व्यक्तीवर व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्ती विरुध्द एमपीडीए कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार यांनी दिले आहेत . फोटो :- जिल्हा पोलीस अधीक्षकहर्ष पोद्दार, पो. नि. पुरुषोत्तमचोबे आणि आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *