एकीकडे प्रशासन म्हणते पीक कर्जासाठी अर्ज करा तर दुसरीकडे बँक म्हणतात उद्दिष्टे पूर्ण झाले शेतकर्यांनी मागायची दाद कोणाकडे राजेश गित्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- प्रशासनाने शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत पीक कर्जासाठी अर्ज करावेत असे आव्हान केले आहे. असून दुसरीकडे संबंधित बँक म्हणतात आमचे पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. तर शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश गित्ते यांनी केला आहे. गित्ते यांनी यासंबंधी संबधित विभाग यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हा शेतकऱ्यांचा प्रश्न दूर करावा अशी मागणी केली आहे. जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी व ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे. व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असून शेतकऱ्यांनी दत्तक असलेल्या बँकाकडे 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत ते अर्ज बँकेने स्वीकारून त्यांना कर्ज वाटप करावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतू बँकेकडे शेतकऱ्यांना कर्जासाठी अर्ज केले असता बँकेचे अधिकारी म्हणतात आमच्या बँकेचे पिक कर्ज देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. असे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा घाट मांडला आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून पावसाने दडी मारली आहे. हे त्यात यावर्षी हातात आलेले पीक परतीच्या अवकाळी पावसाने घातली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खाजगी सावरकारकंडून भरमसाठ व्याजाने पैसे घेतले आहेत. त्यांचे हे देणे फेडण्यासाठी बँकेकडे शेतकरी उंबरठे झिजवत आहेत. तसेच बँका कर्ज देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची अशी त्यांची अवस्था निर्माण झाली आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना खरिपाचे पीक कर्ज न दिल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश गिते यांनी दिला आहे.