ऊस आंदोलनाबाबत आज सहसंचालक कार्यालयात बैठक

अर्धापूर:– भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने एफ आर पी थककवल्याच्या कारणावरून पालक मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी आंदोलनकर्ते व कारखाना प्रशासन यांना चर्चेसाठी बोलावले असून ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी १४ रोजी दुपारी २ वा. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड येथे बैठक बोलावली आहे. भाऊराव चव्हाण कारखान्याकडे गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ५०० रुपये व त्यावरील विलंब व्याज एवढी थकीत एफआरपी रक्कम बाकी आहे. सदरील रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सरपंचांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरापुढे एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन पुकारले आहे. कोरूना आजारा मुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने एकत्र जमतात येणार नाही म्हणून गावची प्रतिनिधी म्हणून सरपंच या आंदोलनात सहभागी होणार आहेत.याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, कारखाना प्रशासन यांच्याशी चर्चा झाल्या असून अद्याप काही तोडगा निघालेला नाही.त्यामुळे सर्वजण आंदोलनावर ठाम असल्याचे शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.आंदोलनासाठी भोकर मतदारसंघ व कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावात जाऊन सर्वपक्षीय सरपंचाच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. आंदोलनासाठी आवश्यक जनजागृती झाली असून स्वातंत्र्यदिनी होणारे आंदोलन ही प्राथमिक स्वरूपात असेल परंतु कारखान्याने वेळेत एफ आर पी न दिल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन नक्कीच होईल असे इंगोले यांनी सांगितले पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा- इंगोले थकित एफआरपी देण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी स्वतःलक्ष घालून पुढाकार घ्यावा व सरपंचावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकऱ्यांना थकीत एफआरपी देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. आम्हाला काही अधिकार नाहीत असे सांगणारे कारखाना प्रशासनासोबत चर्चा करण्यात रस नाही त्याचा फार उपयोग होईल असे वाटत नाही. तरीपण आम्ही चर्चा करू पण तोडगा निघाल्या आंदोलनावर ठाम आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *