उभी बाटली का आडवी बाटली संभ्रम कायम… ? तळीरामाचा नजरा जिल्हाधिकार्याचां आदेशाकडे…!

बीड : राज्य सरकारने लॉकडाऊन 3 साठी नवीन नियमावली जाहीर करत एकल दुकानांना परवानगी दिली आहे. त्याचबरोबर काही नियमावली देखील जाहीर केली आहे. मात्र बीड जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत या संदर्भात कोणताच आदेश प्रशासनाने काढला नव्हता. जिल्ह्यात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे राज्यात काही अंशी सवलत मिळाली असली तरी जिल्ह्यात मात्र अजून कोणताच निर्णय झालेला नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत नागरीकांना आदेशाची प्रतीक्षा होती. काय सुरू राहणार आणि काय बंद ? याबरोबरच संचारबंदीत किती वेळाची शिथिलता असणार ? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा बीड जिल्हाधिकारी यांच्या यांच्या आदेशाकडे लागल्या आहेत. आता आज जिल्हाधिकारी काय आदेश काढतात यावरच बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन 3 मध्ये कशी सूट मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *