FEATUREDLatestNews

उपाध्यक्षाचा आसनावर सामान्य व्यक्ती बसने बालीष व पोरकट पणाचे लक्षण- डाॅ.कुडमूलवार

कुंडलवाडी प्रतिनिधी कुंडलवाडी नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शेख रिहाना बेगम पाशामियाॅ यांचा पराभव करीत काॅग्रेस,व भाजपच्या काही नगरसेवकांचा मदतीने शिवसेनेचे सौ.सुरेखा नरेंद्र जिठ्ठावार अध्यक्ष म्हणून निवडून आल्या पण निवडून आल्यानंतर 1 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या विस दिवसात ज्याकाही घडामोडी घडल्या या बाबत पत्रकारा समोर माहीती देत व त्या प्रत्येक गोष्टीची आम्ही नोंद घेतले आहे.असे म्हणत नवनिर्वाचित नगराध्यक्षाचे पती अति उत्साहाचा भरात उपाध्यक्षाचा आसनावर बसने हे उचित नाही.किंवा उपाध्यक्ष आसन अॅन्टीचेबर मध्ये टाकुन कुलूप लावने लोकशाही पद्धतीत हा बालीष पणा व पोरकट पणा आहे असे मत न.पा.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार दि.20 ऑक्टोबर रोजी नगर परिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी नगरसेवक अशोक पाटील वानोळे,गंगाप्रसाद गंगोणे,पंढरी पुपलवार, नगरसेवीका प्रतिनिधी सयारेड्डी पुपलवार,संजय भास्कर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ.कुडमूलवार म्हणाले. कुंडलवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक डाॅ.अरूणा कुडमूलवार यांना शहरातील सुजान व विकास प्रेमी नागरीक नगराध्यक्ष पदावर बसवीले.मागील 17 नगराध्यक्ष काय केले व 18 वे नगराध्यक्ष डाॅ.अरूणा कुडमूलवार या २०१६ ते2020 या साडेतीन वर्षात कोण कोणते विकासाचे कामे केले याचे सिंहालोकन करावे.कारण कुठल्याही लोकशाही पद्धतीमध्ये आपण प्रतिनिधी का निवडतो काहीतरी विकास कामे व्हावे.ही जनतेची अपेक्षा असते यात 18 वे नगराध्यक्ष कुठेतरी कमी पडले का याचेपण सिंहालोकन करावे.पाच वर्षासाठी जनतेने निवडून दिले असता.लाहानशा तांत्रिक कारणाने आम्ही वेळेचा आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने शासनाने अर्नहर ठरविले.आणि परत निवडणूका होणार हे आम्हाला पण ज्ञात होते.पण एवड्या घाई घाईने शासनातर्फे कार्यक्रम निघेल आणि सर्व मिटिंग रूल,कायद्याची तोडफोड करीत बाय ईलेक्शन घेण्यात येतील अशी आम्हाला कल्पना नव्हती त्यातच 17 सप्टेंबर पर्यंत आमच्या सोबत असेलेले आमचे सहकारी आमच्या सोबत बैमानी केली.बैमानी करीत त्यासोबत नको ते आरोप आमच्यावर लावत आहे.आरोप करताना विशेष जागा नव्हती पण बैमानी करताना काहीतरी आरोप लावावा लावतो ना पक्ष का सोडले जनता विचारेल ना तर असे व काही तरी आरोप लावून आमच्याने बैमानी केली मात्र एवढे निश्चित.आणि बाहेर पडले.त्यानंतर त्याचा गटातील नगरसेवीका अध्यक्ष पदावर बसले.त्यांना त्याचा पुढील कार्यकाळास आम्हीव आमच्या सोबत असलेल्या नगरसेवकतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो.त्यांनी आमच्यासारखे काम करून दाखवावे.शेवटी लोकशाहीत जनता विकास कामच बघते.आणि कामासाठीच निवडून देते तरी त्यांनी भान ठेवाव.आणि त्यांच कामासाठी कामचे पुर्ण सहकार्य राहील.मात्र 1 ऑक्टोबर ते आज 20 ऑक्टोबर या विस दिवसात ज्याकाही घडामोडी घडल्या हे तुमचा समोर आहे.त्या प्रत्येक गोष्टीची आम्ही नोंद घेतले आहे.अति उत्साहाचा भरात एक सामान्य नागरीक उपाध्यक्षाचा आसनावर बसने हे उचित नाही.किंवा उपाध्यक्ष आसन अॅन्टीचेबर मध्ये टाकन लाॅक लावने हे उचीत नाही.हे मला लोकशाही पद्धतीतला बालीष पणा व पोरकट पणा आहे असे वाटते असे ते म्हणाले.तसेच प्रत्येकांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष खुर्चीचा मान ठेवला पाहिजे असे झाले तर उद्या कोणीही बसू शक्ते त्या खुर्चीला सम्मान दिला पाहिजे. सत्ताधारी त्यांच्या आघाडीला महाविकास आघाडी असे टायटल दिले.त्यांनी शहरात महा विकास करून दाखवावे.नुक्तेच त्यांनी नगर परिषद सत्कार समारंभ ठेवले यात माजी आमदार सुभाष साबणे असे वक्तव्य केले होते की कुंडलवाडीचा विकासासाठी निधी कमीपडू देणार नाही.मग त्यांनी माजी.आमदारला प्रशन विचारीत म्हणाले.आपण जेव्हा आमदार होते.तेव्हा तर भाजप शिवसेना संयक्त सरकार होते.शहरास किती निधी दिले हे त्यांनी स्पष्ट करावे ?आमदार असताना निधी दिले नाही.आतातर माजी आमदार आहे.आता कुठले निधी देणार?शहरास ग्रामीण रूग्णालय मंजूर होवून एक वर्षाचा कार्यकाळ लोटला बांकामाचा सुरू होण्याचा ठाव ठिकाना नाही,एक वर्षाचा कार्यकाळ संपत आला कुंडलवाडी नागणी रस्ता बांधकाम आद्याप पुर्ण झाले नाही.तसेच कुंडलवाडी हद्दीतील इण्डेण गॅस गोदाम ते 33 के.व्ही.सबस्टेशन पर्यंत चा 16 कोटीचा चौपदरी रस्ता बांधकामात खोडा निर्माण करून शहराचा विकासात अडथळा आणणारे आता त्यांच्या अशा भुलथापाना आमचे नागरीक बळी पडणार नाही.अकरा महिने आहे.शहात विकास करून दाखवावे असे ते म्हणाले.तसेच त्या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय लक्ष्मण ठक्करवाड उपस्थित होते.आघाडीचा व त्यांच्या काय सबंध आहे? असे तर नव्हे महाविकास आघाडीत आमचे जे चार पाच नगरसेवक भटकलेले सामील झाले त्यांचे तुम्ही नेते आहे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केले.ते तुमचा मार्फत ते आघाडीत गेले का ? याचा त्यांनी खुलासा करावा.कारण ते बिलोली तालूक्याचे इंचार्ज आहे.जिल्हाचे सरचिटणीस आहे.असे म्हणाले. यावे त्यांनी काॅग्रेस पक्षा बद्दल बोलने टाळत म्हणाले मला यावेळी काॅग्रेस बद्दल काहीच बोलायचे नाही.कारण आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर काॅग्रेस बद्दल बोलत आहे मी बोलणार नाही.कारण साद्या नगराध्यक्ष निवडणूकीत तीन आमदार एक पालकमंत्री पुढाकार घेतात म्हणजे ही नगराध्यक्ष निवडणूक त्यांच्यासाठी किती प्रतिष्ठेची होती जनतेला मात्र कळवून आले.असे उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार सागीतले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल,रूपेश साठे,हरीष देशपांडे,माजीद नांदेडकर,संतोष मेहरकर,वसंत मदीकुंटावार,दिगांबर लाडे आदी सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. _____________ भाजप जिल्हा सरचिटणीस तथा अरळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांना त्या कार्यक्रम सामिल होण्या बाबत विचारले असता ते म्हणाले मी शिवसेनेचा व कोण्या पक्षाचा कार्यक्रमात आलो नव्हतो.माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात आलो होतो.आणि भारतीय संस्कृती अशी आहे.की कोणाकडे गेलोतर आदर तिथ्यार्थ कोणाचाही सत्कार करण्यात येते.आणि त्यावेळी माझा सत्कार मी कोरोना आजारातून बर झाल्यामुळे माझा सत्कार करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *