उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी घेतली तालूक्यातील शिक्षणाची आढावा बैठक…!!

कुंडलवाडी : बिलोली येथील गटसाधनकेंद्रात 27 जून रोजी माधव सलगर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली तालुक्याची शिविअ/केंद्रप्रमुख यांच्या कडून बिलोली तालूक्यात चालू असलेल्या शिक्षणाचा आढावा घेतला.
या बैठकीत प्रथम गटशिक्षणाधिकारी हमीद दौलाताबादी यांनी तालुक्यातील एकूण शाळांचा प्रपत्रनिहाय आढावा उपशिक्षणाधिकारी यांच्या समोर मांडले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी यांनी प्रपत्रातील प्रत्येक मुद्यावर केंद्र प्रमुखांकडून आढावा घेतला.शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकांचे ठराव बैठकीत केंद्रप्रमुख यांनी आणलेले होते ते त्यांनी अवलोकित केले.ज्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठका झालेल्या नाहीत त्या घेण्याच्या सूचना सर्व केंद्र प्रमुखांना दिल्या. सलगर यांनी केंद्रप्रमुखानी माहिती तयार करून आणलेल्या प्रपत्राबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे कौतुकही केले.रेडिओ,स्मार्टफोन,टीव्ही इत्यादीबाबत आढावा घेण्यात आले. त्यासोबतच व्हॉट्सअॅप ग्रुप माध्यमातून विद्यार्थी कसे शिकवत आहेत याबाबत प्रत्येक केंद्रप्रमुखांकडून विचारून माहिती घेतली.
शाळा विलगीकरण,निर्जंतुकीकरण याबाबतही प्रत्येक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी आढावा सादर केला.तसेच तालूक्यातील शाळेत वृक्षारोपण करावयाचा शाळांची नावे सादर करण्यात आले.शेवटी सलगर विस्तार अधिकारी वकेंद्रप्रमुखांनी तयार केलेल्या माहितीचे कौतुक करून सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांचे अभिनंदन केले.या बैठकीस गटशिक्षणाधिकारी हमीद दौलताबादी,सर्व विस्तार अधिकारी,सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख हे उपस्थित होते.कार्यक्रमाचेसूत्रसंचालन व
आभार राठोड सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *