उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी… राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध आॅनलाईन स्पर्धांचा निकाल २६ जुलै रोजी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. प्रथमच आयोजित ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. एक्सप्लोरिंग परळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अतिशय रोचक व रोमहर्षक ही स्पर्धा ठरली. त्याचप्रमाणे आजा नच ले डान्स स्पर्धा, बजाते रहो वादन स्पर्धा,मेरी आवाज सुनो गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.त्यामुळे या स्पर्धांच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.या स्पर्धांचा निकाल येत्या २६ जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे. या स्पर्धांच्या परिक्षणाची प्रक्रीया सुरू असुन या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद देत सेवासप्ताहात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.