उद्या मामा चौक येथून काँग्रेस पक्षाची रॅली
जालना शहरातील मामा चौक येथून सकाळी ९ वाजता बंदचे आवाहन करण्यासाठी जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे . या रॅलीमध्ये युवक काँग्रेस, आजीमाजी नगरसेवक, महिला काँग्रेस, सेवादल, एन एस यु आय ,अल्पसंख्याक विभाग , ओबीसी सेल ,अनुसूचित जाती विभाग , कामगार आघाडी ,किसान सेल आदी आघाडीचे पदाधिकारी सामील होणार आहे . हि रॅली मामा चौक येथून शांततेत निघून देऊळगावराजा रोड ,सदर बाजार पोलीस स्टेशन मार्गे, बडी सडक ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून काद्राबाद ,पाणीवेस मार्गे, गरीब शहा बाजार, मस्तगड, गांधीचमन मार्गे ,होत शनिमंदिर चौक, उढाण पुलावरून, नूतन वसाहत अंबड रोड येथे पोहचेल सतकर कॉम्प्लेक्स येथे रॅलीचे विसर्जन करण्यात येणार आहे .